Headlines

washim crime shocking 50 year old woman abused and killed at railway station accused arrested; स्टेशन परिसरात महिलेवर आधी अत्याचार, मग क्रूर हत्या; घटनास्थळावरील ‘त्या’ वस्तू पाहून पोलीसही चक्रावले


वाशिममध्ये रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली असून तपासातून धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

Washim Crime, Railway Station Woman Brutal Killing
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वाशिम: वाशिम शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील एका निर्जन स्थळी ५० वर्षीय महिलेवर पाशवी अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मात्र, वाशिम पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पाशवी कृत्य अन् पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात एका अज्ञात महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिलेचे डोके दगडाने अशा प्रकारे ठेचले होते की ओळख पटवणेही कठीण झाले होते. घटनास्थळावर रक्ताचा सडा, दारूच्या बाटल्या, पॅन्टचा बेल्ट आणि खाण्याचे साहित्य विखुरलेले होते. यावरून नराधमाने आधी महिलेवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर आपली ओळख लपवण्यासाठी व पुरावे नष्ट करण्यासाठी तिची क्रूरपणे हत्या केल्याचा संशय बळावला होता.

अन् २४ तासांत आरोपीला बेड्या

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलिसांसमोर पहिले आव्हान होते ते म्हणजे मृत महिलेची ओळख पटवणे. तांत्रिक तपास आणि चौकशीअंती ही महिला वाशिममधील पंचशील नगर भागातील असून ती शहरात भटकंती करायची, असे निष्पन्न झाले.

Maharashtra TimesUddhav Thackeray: नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भावाचंही केलं कौतुक; म्हणाले, ‘आज माझ्यासोबत माझा भाऊ राज….’

आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी रेल्वे स्टेशन आणि परिसरातील तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पिंजून काढले. यामध्ये एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आली. तपासात हा इसम अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार येथील संतोष रामराव खंडारे असल्याचे समजले. पोलीस त्याच्या गावी पोहोचले, मात्र तो तिथे मिळून आला नाही. तो रेल्वेने अकोल्याला पसार झाल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी अकोला रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला आणि त्याला शिताफीने अटक केली.

आरोपीची कबुली, शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी संतोष खंडारे याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. “दारूच्या नशेत अत्याचार केला आणि त्यानंतर हत्या केली,” असे त्याने मान्य केले आहे. या संदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. बलात्कार झाला आहे की नाही, याचा अंतिम निष्कर्ष पोस्टमार्टम अहवालानंतरच अधिकृतपणे स्पष्ट होईल.”

या कारवाईमुळे वाशिम पोलिसांचे कौतुक होत असले तरी, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटकंती करणाऱ्या एका असहाय महिलेवर झालेल्या या अत्याचारामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा