Wardha Two Youth fell in love with the Same Girl One of them Was Killed with a Sharp Weapon; एक तरुणी, दोन तरुण; दोघांचं एकाच मुलीवर प्रेम, दोघांमध्ये जोरदार वाद; धारदार शस्त्राने एकाला संपवलं
Wardha Two Youth fell in love with the Same Girl One of them Was Killed with a Sharp Weapon; एक तरुणी, दोन तरुण; दोघांचं एकाच मुलीवर प्रेम, दोघांमध्ये जोरदार वाद; धारदार शस्त्राने एकाला संपवलं
Wardha Youth Murder Over Love Dispute : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच वर्धामध्ये काल एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
एकाच तरुणीवर दोघांचं प्रेम एकाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना आर्वी शहराच्या मध्यवर्ती गांधी चौकात घडली असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचं नाव सलीम सबदर शा (वय 30, रा. संजय नगर, आर्वी) असं असून, पोलिसांनी निखिल बुरे (रा. हरदोली) या तरुणास अटक केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सलीम आणि निखिल या दोघांमध्ये एका तरुणीवरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. दोघांनाही तीच मुलगी आवडत असल्यानं त्यांच्यामध्ये वैर निर्माण झालं होतं. याच प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे रूप काल थेट हाणामारीत बदललं. दुपारच्या सुमारास गांधी चौकात सलीम आणि निखिल यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद चिघळताच निखिलने आपल्याजवळील धारदार शस्त्राने सलीमवर वार केले. या हल्ल्यात सलीम गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी निखिल बुरे याला अल्पावधीतच ताब्यात घेण्यात आलं असून, त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे आर्वी शहरात संतापाची लाट उसळली आहे. गांधी चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या या हत्येनं आर्वी शहर हादरलं असून, पुन्हा एकदा युवकांमधील अस्थिर भावनांचा आणि रागाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुनील यांची प्राणज्योत मालवली. पंचक्रोशीतील जमलेले नातेवाईक आणि ग्रामस्थ पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देताना गहिवरले. सुनिल यांचा मृत्यू सर्वांना चटका लावून गेला. आष्टी तालुक्यातील देलवाडी येथील सुनील उर्फ भोजराज भिमराव कोहळे (वय 51) हे प्रचंड हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षापूर्वी रोजगाराच्या शोधार्थ अमरावती येथे गेले. सगळीकडे रोजगाराची शोधाशोध केल्यावर पदरी उपेक्षाच आली. मग त्यांनी स्वतः खासगी शिकवणी टाकण्याचा निर्णय घेतला. अमरावतीच्या वडाळी भागात सुरुवात केली. गणित विषय शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. तिथून सुनील यांचा संघर्षमय प्रवास सुरू झाला. आई वडील आणि दोन बहिणी या सर्व परिवाराला घेऊन ते चालत होते. दरम्यान, सुनील व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्यानं खाली कोसळले होते. त्यानंतर त्यांच्यावर दोन महिन्यांपासून उपचार सुरु होते.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा