Madhya Pradesh Horror: पतीने पत्नी बेपत्ता असल्याबाबत नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.

अक्षय देवराव चोरपगार (वय २७) रा. गोळेगाव ता. दर्यापूर जि. अमरावती असे आरोपीचे नाव आहे. सध्या तो वर्धा जिल्ह्यातील सेलूनजीकच्या मोर्चापूर येथे राहतो. तो सैन्यात नोकरीवर असल्याची माहिती आहे. त्याचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांचा विरोध असल्याने तो घरापासून लांब राहत होता, अशी माहिती आहे. त्यांची पत्नी प्रणिता ही दीड ते दोन वर्षांपासून दाताळा ता. मुर्तिजापूर जि. अकोला येथे माहेरी राहत होती. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. अक्षय हा पत्नीला गावी परत आणण्यासाठी २२ मार्च रोजी कारने गेला होता.
Bhandara Tiger Attack: भंडाऱ्यात महिलेवर वाघाचा हल्ला; दहा फूट नेले फरफटत, संतप्त गावकऱ्यांनी जंगलात लावली आग
दुसऱ्या दिवशी २३ मार्च रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो पत्नी आणि मुलासह मोर्चापूर येथे परत येत होता. दरम्यान, केळझर गावाजवळ त्याचा पत्नीसोबत वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने त्याने गळा आवळून पत्नीची हत्या केली. त्यानंतर पत्नीच्या नातेवाइकांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल केली.
Solapur News : ‘मी तुमच्या लायकीचा बाप नाही’; मुलाला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला अन् वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, सोलापूरमध्ये हळहळ
पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने पत्नीचा मृतदेह छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेंच नदीत फेकून दिला. मृतकाच्या नातेवाइकांनी गावात जाऊन चौकशी केली असता अक्षयने पत्नीची हत्या केल्याची माहिती पुढे आली. याबाबत सेलू पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत अमरवाडा येथे जाऊन मृतदेहाची ओळख पटविली.

