Headlines

Venezuela Economic Crisis Twin Quake Impact; सर्वात शुद्ध कच्च्या तेलाचे साठे असून उपासमारी, त्यात दोन मोठे भूकंप! व्हेनेझुएलाचं आता काय होणार?

Venezuela Economic Crisis: व्हेनेझुएलाची आर्थिक परिस्थितीत खालावण्यामागे बाह्य शत्रू नाही तर, स्वतःच्याच सरकारच्या अरेरावी, फुकटखाऊपणा, खाजगी उद्योगांचे नुकसान आणि बेफिकीर चलन छपाईमुळे झाली आहे. आता जेव्हा या डबघाईला आलेल्या देशाला एकाच दिवसात सलग दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत आणि आता सर्वसामान्य लोक निवारा शोधण्याची धडपड करत आहेत.

Venezuela Economic Impact After Twin Quake
सर्वात शुद्ध कच्च्या तेलाचे साठे असून उपासमारी, त्यात दोन मोठे भूकंप!
Venezuela Earthquake: दक्षिण अमेरिकन राष्ट्र व्हेनेझुएलामध्ये बुधवारी अनुक्रमे 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या या दुहेरी भूकंपानंतरची घटना ही एका शतकातील देशातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी ठरली. सध्या 920 मृतांची संख्या समोर आली आहे, तर आपत्ती झोनमध्ये शोध आणि बचाव कार्य सुरू असून अजूनही हजारो लोक बेपत्ता आहेत.

व्हेनेझुएला आधीच अनेक वर्षांपासून आंतराष्ट्रीय निर्बंधांना सामोरे जात होता की 125 वर्षांतील एकापाठोपाठ एक आलेल्या दोन मोठ्या भूकंपांनी अनेक शहरे उद्धवस्त केली. व्हेनेझुएलामध्ये प्रचंड विध्वंस झाला, अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे झरझर कोसळल्या, 900 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत.

पैसा तोलून वस्तू पोहचवल्या जातात

पैसा तोलून वस्तू पोहचवल्या जातात

व्हेनेझुएलामध्ये महागाई इतकी वाढली आहे की या भूकंपाच्या काळात पावाचा तुकडा किंवा पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी दुकानात गेले तरीही दुकानदार नोटा मोजणार नाही तर, फक्त तराजूवर नोटांचे गठ्ठे तोलून वस्तू देईल.

डॉलर बनलाय किंग

डॉलर बनलाय किंग

परिस्थितीत अशी आहे की तेथील दुकानदारांना आता आपल्याच देशाचा चलनावर भरवसा राहिलेला नाही. औषधांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक दुकानदार फक्त डॉलरमध्येच पेमेंट घेत आहे. अशा स्थितीत, व्यावहारिक अडचण अशी आहे की तुमच्या खिशात डॉलर नसतील, तर जगातील सर्वात श्रीमंत तेल-समृद्ध देशातही उपासमार सहन करावी लागेल.

व्हेनेझुएलाचा आर्थिक पतन कधी सुरू झाला?

व्हेनेझुएलाचा आर्थिक पतन कधी सुरू झाला?

नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामुळे व्हेनेझुएलामधील सद्यस्थिती निर्माण झालेली नाही. हिंदीतील म्हणीप्रमाणे, हा उच्च पदावरील लोकांच्या कृतींचा परिणाम आहे: “आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं.” व्हेनेझुएलाचे आर्थिक पतन कधी सुरू झाला आणि एकेकाळचा श्रीमंत देश अल्पावधीतच कसा गरीब झाला, याचा संपूर्ण घटनाक्रम समजून घ्या.

व्हेनेझुएलाच्या बरबादीची कारणे

व्हेनेझुएलाच्या बरबादीची कारणे

1999 मध्ये सर्वप्रथम व्हेनेझुएलाचा विनाश सुरू झाला. ह्यूगो चावेझ नावाचे अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय नेते अध्यक्ष बनले, ज्यांनी 1999 ते 2013 पर्यंत राज्य केले आणि 2013 मध्ये निकोलस मादुरो त्यांचे उत्तराधिकारी बनले. त्यांच्या कार्यकाळातील 4 चुकीच्या निर्णयांनी देश डबघाईला आला. 2014 मध्ये जागतिक कच्च्या तेलाच्या किमती अचानक कोसळल्यावर संकट खऱ्या अर्थाने उफाळून आले.

‘संसाधनांचा शाप’ अन् सर्व अंडी एका टोपलीत ठेवणे

‘संसाधनांचा शाप’ अन् सर्व अंडी एका टोपलीत ठेवणे

व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वाधिक तेलाचा भंडार आहे. 2000 च्या दशकात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या, तेव्हा व्हेनेझुएला अब्जो डॉलर्स कमावले. तेलातून मिळणारा पैसा कधीच थांबणार नाही, असं सरकारला वाटले आणि त्यांनी कृषी, कारखाने, औषधनिर्माण उद्योग किंवा तंत्रज्ञान विकसित करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. परिणामी देशाला अन्न आणि औषधांच्या गरजांपैकी 80% पेक्षा जास्त गरजा परदेशातून आयात सुरू केली, तर देशाच्या उत्पन्नापैकी 95% वाटा तेल निर्यातीचा होता.

सरसकट मोफत वस्तू अन् खाजगी कंपन्यांचे उच्चाटन

सरसकट मोफत वस्तू अन् खाजगी कंपन्यांचे उच्चाटन

राष्ट्राध्यक्ष ह्यूगो चावेझ यांनी लोकप्रियता वाढवण्याच्या नादात तेल महसुलातून मिळालेला पैसा मोफत सुविधांवर उधळला. तेल महसुलाचा वापर मोफत सुविधांवर उधळला. ज्यामुळे सरकारने या कंपन्यांच्या जागी निष्ठावान राजकारणी आणि लष्करी अधिकाऱ्यांना नेमले आणि जागी कुशल अभियंते व व्यवस्थापकांची नियुक्ती केली. भ्रष्टाचार आणि अनुभवाच्या अभावामुळे सर्व कारखाने आणि ऑइल रिफायनरी केंद्रांना टाळं लागले. यामुळे कधीकाळी दररोज 35 लाख बॅरल तेलाचे उत्पादन करणाऱ्या व्हेनेझुएलाचे उत्पादन एक तृतीयांशने कमी झाले.

बाजारातील नियमांकडे दुर्लक्ष

बाजारातील नियमांकडे दुर्लक्ष

कारखाने बंद पडू लागले आणि वस्तूंची टंचाई जाणवू लागल्यावर महागाई वाढली, ज्याला आला घालण्यासाठी सरकारने आत्मघाती पाऊल उचलले. कोणताही दुकानदार पाव, दूध, साबण किंवा चिकन यांसारख्या जीवनावश्यक वस्तू ठराविक किमतीपेक्षा जास्त दराने विकू शकत नाही, असा सरकारने कायदा केला. पण सरकारने इतक्या वाढीव किमती निश्चित केल्या की कंपन्यांसाठी उत्पादन करणे तोट्याचे बनले आणि त्यांनी उत्पादन पूर्णपणे थांबवले. सुपर मार्केटमधील शेल्फ रिकामे झाले, ज्यामुळे ‘ब्लॅक मार्केटिंग’ सुरू झाले आणि वस्तू मूळ किमतीपेक्षा 100 पट महाग मिळू लागल्या.

अंधाधुंद चलनी नोटांची छपाई

अंधाधुंद चलनी नोटांची छपाई

2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत शंभर डॉलरवरून 40 डॉलरवर घसरली तेव्हा व्हेनेझुएलाचे उत्पन्न रातोरात गायब झाले. परदेशातून अन्न आणि औषधांची आयात करण्यासाठी सरकारकडे डॉलरच शिल्लक राहिले नाही. हीच वित्तीय तूट भरून काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मादुरोच्या सरकारने मध्यवर्ती बँकेला कोणत्याही ठोस हमीशिवाय रात्रंदिवस बेफिकीरपणे नवीन नोटा छापण्याचे आदेश दिले. यामुळे अति-महागाई निर्माण झाली. लोक नोटांनी भरलेली पोती घेऊन फिरू लागले आणि पैशाचे मूल्य कागदाच्या तुकड्याएवढे राहिले.

…अन् मग अमेरिकेने लादले निर्बंध

...अन् मग अमेरिकेने लादले निर्बंध

व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यावर 2019 पासून राष्ट्राध्यक्ष मादुरोची हुकूमशाही उलथवून टाकण्यासाठी अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी व्हेनेझुएलाच्या तेल उद्योग व बँकांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले. या निर्बंधांनी या देशाची उरलीसुरली ताकदही नष्ट केली, ज्यामुळे तब्बल 79 लाख लोकांचे स्थलांतर सुरू झाले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा