Headlines

Vegetarian Diet benefits and effect on body, after quit meat or non veg how body react, healthy food options in veg diet; मांसाहार सोडल्यावर Protein, B12, Iron कसे मिळवायचे? हेल्दी व्हेज डाएट पदार्थ


मांसाहार सोडून शाकाहारी होणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, मात्र त्याच्या जागी काय खाता हे अधिक महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन नसल्यास प्रोटीन, व्हिटॅमिन B12, आयर्न, झिंक, ओमेगा-३ आणि व्हिटॅमिन D यांची कमतरता होऊ शकते. डाळी, कडधान्ये, सोया, टोफू, पनीर, दही, बिया आणि सुकामेवा यांचा आहारात समावेश केल्यास पोषणाची गरज पूर्ण करता येते. शाकाहारी थाळी कशी संतुलित ठेवावी, जाणून घ्या.

vishal dadlani quit meat
vishal dadlani quit meat
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल ददलानी यांनी सांगितले की, वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी मांसाहार करणे सोडले. त्यांच्या विचारांत अचानक बदल झाला आणि त्यांनी पूर्णपणे शाकाहारी आहार स्वीकारला. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “मी ३० वर्षांपूर्वी शाकाहारी झालो. साधारण १९ वर्षांचा असताना, मी दिवसातून तिन्ही वेळा फक्त मांसच खायचो. मला कोणत्याही गोष्टीचे माझ्यावर नियंत्रण असलेले आवडत नाही.” ते पुढे म्हणतात, “त्याच कारणामुळे मी धूम्रपानही सोडले. मला स्वतःचाच कंटाळा आला होता. मी दिवसाला ४० सिगारेट्स ओढायचो. मग एके दिवशी मी त्या सोडून दिल्या. मांसाहार असो वा धूम्रपान; एखादी गोष्ट सोडायची असेल, तर ती तुमच्या जिद्दीचा विषय बनली पाहिजे. त्या गोष्टीपेक्षा तुम्ही स्वतःला अधिक मोठे सिद्ध केले पाहिजे.”

मांसाहार सोडण्याचा आणि शाकाहारी बनण्याचा निर्णय हा आरोग्यदायी ठरू शकतो. परंतु, केवळ मांसाहार सोडण्यापेक्षा त्याच्या जागी तुम्ही कोणता आहार समाविष्ट करता, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. जेव्हा शाकाहारी आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने (Protein), फायबर, निरोगी फॅट्स, पूर्ण धान्य आणि भाज्या यांचा समावेश असतो, तेव्हा तो चयापचय क्रिया (Metabolic Health) उत्तम ठेवण्यास मदत करतो. याउलट, योग्य नियोजनाशिवाय फक्त मांसाहार सोडल्यास शरीरात आवश्यक पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. जेव्हा लोक नैतिक, पर्यावरणीय किंवा धार्मिक कारणांमुळे पूर्णपणे व्हेजिटेरियन आहाराचा अवलंब करण्याचा विचार करतात तेव्हा त्यांच्या शरीरात नेमके काय घडते.

तुम्ही एका रात्रीत मांसाहार सोडणे सुरक्षित आहे का?

तुम्ही एका रात्रीत मांसाहार सोडणे सुरक्षित आहे का?

होय, शाकाहारी होण्यापूर्वी मांसाहार हळूहळू कमी केलाच पाहिजे असा कोणताही वैद्यकीय नियम नाही. तुम्ही एका रात्रीतही मांसाहार सोडून शाकाहारी बनू शकता. पचनसंस्थेवर होणारे बदल:

  • भाज्या, फळे, डाळी आणि कडधान्यांमुळे आहारात फायबरचे (Dietary Fibre) प्रमाण अचानक वाढते.
  • यामुळे सुरुवातीला काही लोकांना पोटात गॅस (Bloating) किंवा पचनात तात्पुरते बदल जाणवू शकतात. परंतु, आतडे या नव्या आहाराशी जुळवून घेईल तसे हे बदल आपोआप शमतात.
  • मांसाहार सोडल्याने शरीर लगेच ‘डिटॉक्स’ (Detox) होत नाही, तर फायबरयुक्त आहाराची गुणवत्ता आतड्यांचे आरोग्य आणि पचन सुधारण्यास मदत करते. मुबलक पाणी पिण्याने हा बदल अधिक सोपा होतो.

मांसाहाराशिवाय शरीराला पुरेशी प्रथिने मिळतात का?

मांसाहाराशिवाय शरीराला पुरेशी प्रथिने मिळतात का?

होय, शाकाहारी आहारात योग्य नियोजन केल्यास शरीराला आवश्यक तितकी प्रथिने सहज मिळू शकतात. वजन कमी करणारे लोक, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी स्नायू (Muscles) मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक असतात. शाकाहारी प्रथिनांचे मुख्य स्त्रोत:

  • डाळी, राजमा आणि चवळी/चणे.
  • सोयाबीन, टोफू (Tofu) आणि पनीर.
  • दही, दूध, ड्रायफ्रूट्स (Nuts) आणि बिया (Seeds).
    मांसाहार सोडल्यानंतर त्याच्या जागी पांढरी ब्रेड, बिस्किटे किंवा तळलेले पदार्थ यांसारख्या रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचा वापर करणे आरोग्यासाठी अजिबात हिताचे नाही.

शाकाहारी आहाराचा पचनक्रियेवर कसा परिणाम होतो?

शाकाहारी आहाराचा पचनक्रियेवर कसा परिणाम होतो?

शाकाहारी आहार पद्धतीमध्ये आहारातून अधिक प्रमाणात तंतूमय पदार्थ (फायबर) घेणे आवश्यक असते, कारण ते आतड्यांमधील जीवाणूंचे पोषण करतात. हे जीवाणू ‘ब्युटायरेट’ सारखी ‘शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड्स’ तयार करण्यास मदत करतात. ही फॅटी ॲसिड्स आतड्यांचे आवरण निरोगी ठेवतात आणि पचनक्रियेस सहाय्य करतात.

मांसाहार सोडल्याने पचनशक्ती सुधारू शकते का?

मांसाहार सोडल्याने पचनशक्ती सुधारू शकते का?

हो, परंतु पचनसंस्थेवर होणारा प्रत्यक्ष परिणाम हा दैनंदिन आहारातील एकूण निवडींवर अवलंबून असतो. ‘फ्रंटियर्स ऑफ न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, शाकाहारी लोकांच्या आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे वातावरण (gut environment) वैविध्यपूर्ण असते आणि यामुळे मलविसर्जनाची प्रक्रिया नियमित राहण्यास मदत होऊ शकते. तरीही, पचनाच्या आरोग्यावर होणाऱ्या नेमक्या परिणामामध्ये शरीराच्या मूळ रोगप्रतिकारक शक्तीची भूमिका अधिक महत्त्वाची असते.

व्हिटॅमिन B12, आयर्न, झिंक, ओमेगा-३ आणि व्हिटॅमिन D ची भरपाई कशी करावी?

व्हिटॅमिन B12, आयर्न, झिंक, ओमेगा-३ आणि व्हिटॅमिन D ची भरपाई कशी करावी?

शाकाहारी आहारात काही सूक्ष्म पोषक घटकांकडे (Micronutrients) विशेष लक्ष देणे गरजेचे असते:

  • व्हिटॅमिन B12 : नैसर्गिक B12 चे स्त्रोत प्रामुख्याने प्राणिजन्य अन्नात असतात. त्यामुळे शाकाहारी लोकांनी रक्तातील पातळीनुसार सप्लीमेंट्स किंवा B12 फोर्टिफाइड पदार्थांचा वापर करावा.
  • लोह (Iron) : डाळी, बीन्स, पालेभाज्या आणि बियांमधून लोह मिळते. शाकाहारी लोहाचे अवशोषण (Absorption) वाढवण्यासाठी लोहयुक्त पदार्थांसोबत व्हिटॅमिन C युक्त पदार्थ (उदा. लिंबू) खावेत.
  • झिंक आणि ओमेगा-३ : कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि ड्रायफ्रूट्समधून झिंक मिळते. तर ओमेगा-३ फॅट्ससाठी फ्लेक्ससीड्स (अळशी), जिया सीड्स आणि अक्रोड (Walnuts) उत्तम पर्याय आहेत.
  • व्हिटॅमिन D : सूर्यप्रकाश आणि रक्तातील तपासणीनुसार व्हिटॅमिन D च्या सप्लीमेंट्सची गरज भासू शकते.

शाकाहारमुळे कोलेस्टेरॉल, हार्ट हेल्थ चांगली व वजन नियंत्रणात राहते?

शाकाहारमुळे कोलेस्टेरॉल, हार्ट हेल्थ चांगली व वजन नियंत्रणात राहते?

होय, योग्य शाकाहारी आहारामुळे वजन आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मोठी मदत होऊ शकते. ‘युरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, शाकाहारी आहार घेणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका १५-२१% कमी असू शकतो. विशेषतः, ‘जामा’ (JAMA) या संशोधनानुसार, तुमच्या शरीरातील ‘बॅड कोलेस्ट्रॉल’चे प्रमाण ६.६-६.७ mg/dL ने कमी होऊ शकते.

  • कोलेस्टेरॉल आणि हृदय : फायबर, भाज्या आणि असंतृप्त फॅट्स (Unsaturated fats) मुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल (Lipid profile) सुधारते.
  • वजन नियंत्रण : फायबरयुक्त आहारामुळे पोट भरपूर वेळ भरलेले राहते, ज्यामुळे अतिखाणे टळते.
  • सावधानता : केवळ ‘शाकाहारी’ असणे म्हणजे ‘कमी कॅलरीज’ नव्हे. चीज, मिठाई, तळलेले पदार्थ आणि पॅक केलेले शाकाहारी पदार्थ खाल्ल्यास वजन वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी मांसाहार सोडून रिफाइंड कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.

निरोगी शाकाहारी थाळी कशी बनवावी आणि कोणी काळजी घ्यावी?

निरोगी शाकाहारी थाळी कशी बनवावी आणि कोणी काळजी घ्यावी?

निरोगी शाकाहारी जीवनशैली स्वीकारताना प्रत्येक मुख्य जेवणात प्रथिने, मुबलक भाज्या, योग्य प्रमाणात पूर्ण धान्य आणि निरोगी फॅट्स असावेत:

  • नाश्ता : भाज्या घातलेले पोहे व दही, सुकामेवा/बिया घातलेले ओट्स किंवा पनीर/टोफूची भुर्जी, घरी बनवलेले साधे दही, स्टील-कट ओट्स, सुकामेवा आणि बिया यांचे मिश्रण.
  • जेवण : डाळ किंवा राजमा, मोसमी भाज्या, चपाती किंवा ब्राऊन राईस, कोशिंबीर आणि दही, डाळ, चपाती आणि भाजी.
  • रात्रीचे जेवण : टोफू/पनीरसोबत भाज्या आणि मर्यादित प्रमाणात चपाती, राजमा, पनीर किंवा सॅलड यांसारख्या पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता.
  • स्नॅक्स : फळे, सुकामेवा, भाजलेले चणे, मोड आलेली कडधान्ये किंवा साखर नसलेले दही, वनस्पती-आधारित आहारामुळे होणारी पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी भाजलेले चणे किंवा फळे.
    पोषक घटकांची कमतरता असलेले लोक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, पौगंडावस्थेतील मुले आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी मोठा आहार बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा डाएटिशियनचा सल्ला घ्यावा.
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Aug 19, 2026, 04:51 PMMedically Reviewed byDr. Dr Pranav Ghody
  • Aug 19, 2026, 04:51 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम