Headlines

Vasai Virar Heavy Rain Disrupts Western Local Train Services Flood in Palghar; वसई-विरारला झोडपले; पश्चिम रेल्वेसह लोकलवर परिणाम, प्रवाशांची रुळांवरुन जीवघेणी पायपीट, रस्ते, घर जलमय


Vasai Virar Rain News : हवामान विभागाने दिलेल्या मंगळवारी विविध भागांसाठी दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने मुसळधार पाऊस, तसेच सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर स्थानिक प्रशासनांनी सुट्टीचा निर्णय जाहीर केला आहे.

Vasai-Virar Rain Updates
वसई विरार मुसळधार पाऊस पश्चिम लोकल रेल्वे वेळापत्रक(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, वसई : वसई-विरारमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पुराचा मोठा विळखा बसला. शहरांतर्गत रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद पडली, तर पश्चिम रेल्वेचाही खोळंबा झाला. वसई ते नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यानचे रुळ गुडघाभर पाण्याखाली गेल्याने वसई ते विरार आणि पुढे पालघरच्या दिशेने लोकल सेवा दुपारनंतर पूर्णपणे खंडित झाली होती. परिणामी, कामावर निघालेल्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यांना रेल्वेरुळांवरूनच जीवघेणी पायपीट करावी लागली.

कमरेइतक्या पाण्यातून पुन्हा घर गाठावे लागले

पाणी हळूहळू ओसरत असून, काही वेळातच रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरू होईल, असे प्रशासकडून सांगण्यात आले. प्रशासनातर्फे सोमवारी पावसाचा ‘रेड ॲलर्ट’ जाहीर करण्यात आला होता. तरीही नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर कमरेइतक्या पाण्यातून पुन्हा घर गाठावे लागले. वसई स्थानकात अनेक लोकलगाड्या रुळांवरच अडकून पडल्या. विरार स्थानकात ‘वडोदरा एक्स्प्रेस’ थांबवून ठेवावी लागली. विरारच्या पुढे सफाळा आणि पालघर स्थानकांदरम्यानही रुळांवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक पूर्णपणे खोळंबली.
Maharashtra TimesNashik Red Alert : ढगफुटीचा इशारा, खबरदारीचा पुकारा; नाशिकला रेड अलर्ट, शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, आपत्कालीन स्थितीत कुठे संपर्क करणार?

महानगरपालिकेच्या नियोजनावर नागरिकांचा तीव्र संताप

चर्चगेट ते वसईदरम्यानची सेवा कशीबशी सुरू असली, तरी या मार्गावर गाड्या अत्यंत विलंबाने धावत होत्या. वसई ते नालासोपारादरम्यान रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारनंतर पूर्णपणे बंद झाली. शहरांतर्गत रस्ते वाहतूक आधीच बंद असल्याने प्रवाशांकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. त्यामुळे संतप्त आणि हताश झालेल्या नागरिकांनी वसई ते नालासोपारा आणि नालासोपारा ते विरार दरम्यान थेट रेल्वेरुळांवरूनच पायी प्रवास सुरू केला. पाऊस आणि साचलेल्या पाण्यात ही पायपीट अत्यंत धोकादायक ठरत आहे. दरवर्षी पावसाळ्यात नालासोपारा आणि विरार परिसराची हीच अवस्था होत असल्याने रेल्वे प्रशासन आणि स्थानिक महानगरपालिकेच्या नियोजनावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रस्त्यावरील पाण्यात मके धुतले

रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात मके धुणाऱ्या ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील विक्रेत्याची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या विक्रेत्याला मारहाण केली, तसेच ठाणे महापालिकेच्या पथकाने त्याच्यावर बडगा उगारला.
Maharashtra TimesLonavala News : लोणावळ्यात कलम 163 लागू, मुसळधार पावसाने संभाव्य धोका लक्षात घेता निर्बंध लागू

पालघरमध्ये पूरसदृश स्थिती

गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीवर पालघर जिल्हा प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत असून मदत, बचाव व पुनर्वसनाची कामे युद्धपातळीवर सकाळपासून सुरू करण्यात आली आहेत. ६ जुलै रोजी सकाळी १०.१५ वाजेपर्यंत, जिल्ह्यात सरासरी १३२.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. डहाणूतील शेणसरी येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. माहीम-केळवा लघु पाटबंधारे धरणाची पाणी साठवण क्षमता १०० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे. झांजरोळी धरणाला तडे गेले असून या ठिकाणी सूर्या पाटबंधाराचे कार्यकारी अभियंता व सहकारी धूप थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Maharashtra TimesJNPA Accident : वाऱ्याचा वेग एवढा की थेट भलंमोठं कंटेनर कोसळलं, कामगार दबले, एकाचा मृत्यू, दोन जखमी

घोडबंदर ते मिरा-भाईंदर… तीन तास

ठाणे-घोडबंदर रोडवर मिरा-भाईंदरकडे येणाऱ्या मार्गिकेवर सकाळी ट्रक उलटल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यासह मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनांचा वेग मंदावला. परिणामी कोंडीमुळे सोमवारी सकाळी घोडबंदर रोड ते मिरा-भाईंदर अशा अवघ्या अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल तीन लागले. ठाणे-घोडबंदर रोडवर कर्पे कंपाउंडजवळ लाकडाचे ओंडके वाहून नेणारा ट्रक सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उलटला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा