Mohansingh Parmar : मुख्य आरोपी सागर भानुशाली हा ‘जीएसएम फॉइल्स’चा अध्यक्ष आहे, तर मोहनसिंग परमार हे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आहेत. परमार यांच्याकडून घेतलेले ३२ कोटी रुपये परत करणे टाळण्यासाठी आणि ‘जीएसएम फॉइल्स’ कंपनीवर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी सागरने हा कट रचल्याचा आरोप आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वसई : वसईतील उद्योजक मोहनसिंग परमार (४६) यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वालीव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार सागर भानुशाली (३३) याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली. परमार यांच्याकडून घेतलेले ३२ कोटी रुपये परत करणे टाळण्यासाठी आणि ‘जीएसएम फॉइल्स’ कंपनीवर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे.
मुख्य आरोपी सागर भानुशाली हा ‘जीएसएम फॉइल्स’चा अध्यक्ष आहे, तर परमार हे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण-इस्रायल संघर्षानंतर अमेरिकेच्या शेअर बाजारात आलेल्या घसरणीमुळे सागर भानुशालीला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. शुक्रवारी एनएसईवर ‘जीएसएम फॉइल्स’च्या शेअरची किंमत २० टक्क्यांच्या ‘लोअर सर्किट’सह १९२ रुपयांवर बंद झाली. “कंपनीच्या कामकाजात सातत्य राखण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापन टीमने आवश्यक पावले उचलली आहेत. सध्या, वसई आणि अहमदाबाद येथील कंपनीचे उत्पादन प्रकल्प सुरळीतपणे सुरु आहेत,” अशी माहिती कंपनीने एनएसई वर दिली. Tanmay Wange : पुण्यातील MBBS चा विद्यार्थी 14 दिवसांपासून बेपत्ता, आई रुग्णालयात, हॉस्टेलवर रॅगिंग झाल्याचा आरोप
32 कोटी परत करणे टाळण्यासाठी कट
जीएसएम फॉईल्स ही कंपनी औषधनिर्माण क्षेत्रासाठी ‘ब्लिस्टर फॉईल्स’ आणि ‘ॲल्युमिनियम फार्मा फॉईल्स’च्या उत्पादनाचे काम करते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, सागर भानुशालीने परमार यांना कंपनीतील आपला हिस्सा विकत घेण्यास राजी केले होते. त्याबदल्यात जवळपास ३२ कोटी रुपये मिळवले होते. मात्र, ही रक्कम परत करण्याऐवजी त्याने परमार यांचा काटा काढण्याचा कट रचला. परमार यांच्या मृत्यूनंतर आपली आर्थिक जबाबदारी संपेल आणि कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवता येईल, असा त्याचा समज होता.
Maharashtra Rainfall : 3 दिवसात चित्र बददलं, IMD Report पावसाची तूट कमी, अनेक जिल्ह्यांना दिलासा
रस्त्यात गोळीबार
हा हल्ला २४ जुलै रोजी वसई (पूर्व) येथील नवजीवन भागातील डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमधील कंपनीच्या आवारात झाला. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मोहनसिंग परमार यांचा रस्ता अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. पहिली गोळी परमार यांच्या खांद्यावर लागली. हल्लेखोराने दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, परंतु पिस्तूल जॅम झाले. त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्याने बंदुकीच्या मुठीने परमार यांच्यावर प्रहार केला. Atul Chavan : पत्नी भाजप आमदार, PWD तील मुख्य अभियंते अतुल चव्हाणांचा तडकाफडकी राजीनामा, व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा पोलिसांच्या तपासात सागर भानुशाली हा मुख्य संशयित असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक माहिती आणि स्थानिक गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, वालीव पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या ‘स्पेशल टास्क फोर्स’च्या मदतीने त्याचा शोध घेतला आणि त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. त्यानंतर इतर सहा आरोपींनाही वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, सागरने सुपारी देऊन हत्या घडवून आणण्यासाठी ३० लाख रुपये दिले होते; यात ५ लाख रुपयांच्या अॅडव्हान्सचाही समावेश होता. या हल्ल्यात गोळी लागल्याने जखमी झालेल्या परमार यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा