Vandana Gupte Exclusive : काही कलाकार नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांपैकी कुणाचा फोन वाजला तर लगेच प्रयोगमध्येचं थांबवून संताप व्यक्त करतात. यावर आता वंदना गुप्ते यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांना आपापले फोन सायलेंटवर ठेवण्याची किंवा बंद करण्याची सूचना दिली जाते. मात्र, काही वेळेस नाटकाचा प्रयोग सुरू असताना एखाद्या प्रेक्षकाचा फोन मोठ्यानं वाजतोच. याबद्दल अनेक कलाकार प्रयोग संपल्यानंतर अथवा प्रयोग मध्येच थांबवून संताप व्यक्त करतात. अशातच आता यावर सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं मत मांडलं आहे. ‘
काय म्हणाल्या वंदना गुप्ते?
वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘नाटक सुरू असताना कुणाचा फोन वाजला तरीही मी कधीच थांबत नाही. ही आजची मुलं थांबतात, दर्शवतात. कशाला? म्हणजे तुम्ही नाटकात इन्व्हॉल्व नसता. तीन तासांच्या प्रयोगामध्ये तुमची इन्व्हॉल्व्हमेन्ट नसेल, ह्याचा अर्थ तुमचं लक्ष नाहीये. फोनची बेल वाजली तर तुमचं लक्ष विचलित होत असेल तर असं कसं चालेल?’
Prasad Khandekar : ‘तुझ्याबरोबर हसता येतं, मनातलं बोलता येतं, काहीही न बोलताही खूप काही समजतं’, नम्रता संभेरावसाठी प्रसादची खास पोस्ट ”चार चौघी’ नाटकात माझा २० मिनिटांचा मोनोलॉग होता. तो मोनोलॉग सुरू व्हायच्या आधी मी डोअर किपरला सूचना देऊन ठेवायचे. त्या २० मिनिटांमध्ये कुणालाही बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि बाहेरून कुणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. कारण मी ते एकटीनं बोलायचे. बाकी इतर वेळी सगळ्यांसोबत संवाद असतात. त्यामुळे फोन वाजला तरी प्रत्येकवेळी त्यांना आठवण करून द्यायची गरज नाही. प्रेक्षकांनाही समजतं, त्यांच्याकडून चूक झालीये. हे शिक्षण मला अरविंद देशपांडे यांच्याकडून मिळालं.’
स्वतःचा अनुभव सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘मी अरविंद देशपांडे यांच्यासोबत ‘प्रेमाच्या गावा जाऊया’ हे नाटक केलेलं. त्यात माझी खूप छोटी भूमिका होती. त्या नाटकाचा कोकणात दौरा होता आणि ओपन थिएटर होतं. रंगमंचावर अरविंद देशपांडे, मी आणि निवेदिता सराफ होतो. पहिल्या अंकाचा पडदा पडतो आणि माझी एक्झिट होते, असं होतं. मागे आंब्याचं झाड होतं, त्यावरचा आंबा माझ्यासमोर पडला. मी जाता-जाता तो आंबा उचलला. नंतर आतमध्ये आल्यावर अरविंद देशपांडे माझ्यावर खूप भडकले. ‘त्या दोन तासात तुमची नाटकाच्या बाहेरचा विचारच कसा करता? तो आंबा तिथे राहिला असता तर काय झालं असतं?’ असं अरविंद सर मला म्हणाले. त्यामुळे असं कोणी थांबलं की, मला राग येतो. पण, मी बोलत नाही. आजच्या मुलांनी याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि प्रयोग पुढे सुरू ठेवला पाहिजे.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा