Richest People in the World: भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आणि जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी आहे. पण, आपल्या देशात 10 लाख डॉलर्सपेक्षा जास्त निव्वळ संपत्ती असलेल्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. सर्वाधिक लक्षाधीश कोणत्या देशात राहतात जाणून घेऊया.

जगातील सर्वात श्रीमंत लोक कुठं राहतात?
UBS ग्लोबल वेल्थ यादीत अव्वल स्थानावर युरोपमधील सर्वात सुंदर देशांपैकी मानला जाणारा, स्वित्झर्लंड, आहे. या देशाचे दरडोई उत्पन्न $910,000, म्हणजेच अंदाजे 9.75 कोटी आहे. बँकिंग, विमा आणि पर्यटन देशाच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी असून येथे प्रगत औषधनिर्माण क्षेत्र आणि स्विस घड्याळे जगभरात प्रतिष्ठित आहेत. तसेच इथली दुग्धजन्य पदार्थ आणि चॉकलेटदेखील जगभर प्रख्यात आहेत.
श्रीमंत देशांमध्ये अमेरिकेचा दुसरा नंबर
त्यानंतर सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर लागतो. UBS ग्लोबल वेल्थच्या अहवालानुसार अमेरिकेतील एका व्यक्तीचे सरासरी वार्षिक उत्पन्न अंदाजे 6,69,000 डॉलर्स किंवा अंदाजे 6.45 कोटी रुपये आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात सर्वात भारी असून जगाच्या एकूण आर्थिक उत्पादनात अंदाजे 26% वाटा उचलते. तसेच अमेरिकेचे चलन, डॉलर, जगातील सर्वात मजबूत मानले जाते.
लक्झेंबर्ग
जगातील सर्वात श्रीमंत लोक असलेल्या देशांच्या यादीत लक्झेंबर्ग तिसऱ्या क्रमांकावर आहे. लक्झेंबर्गमधील सरासरी वार्षिक उत्पन्न अंदाजे $655,500 किंवा अंदाजे 6.32 कोटी रुपये असल्याचे यूबीएसचे म्हणणे आहे. जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात विकसित अर्थव्यवस्थांपैकी लक्झेंबर्ग या युरोपीय देशात रसायने, रबर, माहिती तंत्रज्ञान, अन्न आणि अवकाश तंत्रज्ञानासाठी एक मोठी बाजारपेठ आहे.
हाँगकाँग
आशियातील हाँगकाँग UBS च्या सर्वात श्रीमंत लोकांच्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. हाँगकाँगचे वार्षिक दरडोई उत्पन्न $648,000, जे भारतीय चलनात 6.25 कोटी रुपयांच्या बरोबरीचे असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर येते. हाँगकाँग एक मुक्त बाजारपेठेची अर्थव्यवस्था असून एकूण GDP सुमारे $400 अब्ज आहे, पण कमी लोकसंख्येमुळे येथील दरडोई उत्पन्न खूप जास्त आहे.
ऑस्ट्रेलिया
सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीतील पाचवा देश ऑस्ट्रेलियातील सरासरी वार्षिक उत्पन्न 6,16,00 डॉलर्स, भारतीय चलनात अंदाजे 5.94 कोटी रुपये आहे. इथे सेवा क्षेत्र उत्पन्नाचे सर्वात मोठे स्रोत असून जीडीपीमध्ये 70% योगदान देते. तसेच लोहखनिज, कोळसा आणि गॅसच्या खाणकामातूनही लक्षणीय महसूल मिळतो. याशिवाय गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियाचा भारतासोबतचा व्यापार सातत्याने वाढत आहे.
सिंगापूर
सिंगापुर या आणखी एका आशियाई देशाने यूबीएसच्या यादीत स्थान मिळवले आहे. सिंगापूरमधील सरासरी वार्षिक उत्पन्न 5.27 लाख डॉलर्स किंवा अंदाजे 5 कोटी रुपये असून वित्तीय सेवांमधून सर्वाधिक महसूल मिळतो, जो देशाच्या जीडीपीच्या 73% आहे. सिंगापुर येथील उत्पादन क्षेत्र, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, रसायने आणि बायोमेडिकल उत्पादने, जागतिक स्तरावर ओळखले जाते. तसेच येथील बंदर जगातील सर्वात व्यस्त बंदरांपैकी आहे.
डेन्मार्क
यादीतील आणखी एक युरोपिय देश यूबीएसच्या यादीत 7 व्या क्रमांकावर आहे. या यादीनुसार, डेन्मार्कचे सरासरी वार्षिक दरडोई उत्पन्न 5,23,000 डॉलर्स किंवा अंदाजे 5 कोटी रुपये असल्याचा अंदाज असून सेवा क्षेत्र देशाच्या जीडीपीमध्ये अंदाजे 75% योगदान देते आणि देशातील 80% लोकसंख्येला रोजगाराची संधी देते. याशिवाय औषधनिर्माण, पवन ऊर्जा आणि जहाजबांधणी यांसारखी क्षेत्रे देखील लक्षणीय उत्पन्न मिळवतात. डेन्मार्क एकेकाळी दुग्ध उत्पादनात अग्रेसर मानला जात होता, पण आता तंत्रज्ञान शेतीपेक्षा प्रगत झाले आहे.

