Headlines

US Preschool Fees Shock Indian Mom 9 Lakh a Year for Early Education Video Viral | बालवाडीची फी ९ लाख रुपये, आठवड्याला फक्त २ दिवस शाळा, अमेरिकेतील भारतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल


US Education System: अमेरिकेतील एका भारतीय महिलेने आपल्या मुलीसाठी प्रीस्कूलची चौकशी केली. या महिलेला वर्षाला ८ ते ९ लाख रुपये फी म्हणून भरावे लागतली असं सांगण्यात आलं. या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी सुद्धा अवाक् झाले आहेत.

US preschool fees
(फोटो सौजन्य – Pavel Danilyuk/pexels.com)
शिक्षणाचा खर्च गेल्या काही काळात प्रचंड वाढला आहे. विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अगदी बालवाडीसाठीसुद्धा हजारो-लाखो रुपये घेतले जातात. त्यामुळे सामान्य माणूस कर्ज काढून आपल्या मुलांना शिकवताना दिसतोय. असो, पण जी स्थिती भारतामध्ये आहे, तीच स्थिती अमेरिकेत असल्याचा अनुभव सांगणारा एक व्हिडीओ समोर आलाय. एक भारतीय महिला आपल्या मुलीला शाळेमध्ये टाकण्यासाठी विचारपूस करतेय. पण प्रीस्कूलसाठीच तिला तब्बल वर्षाला ८ ते ९ लाख रुपये फी भरावी लागणार असल्याचं सांगितलं जातंय. चला पाहूया हा व्हायरल होणारा व्हिडीओ.

इतके पैसे का घेतले जात आहेत?

इतके पैसे का घेतले जात आहेत?

अमेरिकेत राहणाऱ्या सोनल चौधरी या महिलेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिची मुलगी आता दोन वर्षांची झाली आहे. त्यामुळे मुलीला शाळेत घालण्यासाठी ती विचारपूस करतेय. दरम्यान, घराजवळ असलेल्या एका खासगी प्रीस्कूलमध्ये चौकशीसाठी गेली. त्यावेळी चेरिल नावाच्या महिला स्टाफने तिला संपूर्ण शाळा दाखवली. शाळेतील विविध कार्यक्रम, सोयी-सुविधा दाखवल्या.

या शाळेत आठ विद्यार्थ्यांचा एक ग्रुप असतो आणि प्रत्येक ग्रुपला दोन शिक्षक असतात. म्हणजे दर चार विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी रचना असते. मुलांना केवळ पुस्तकाधारित शिक्षण न देता सिंगिंग, योगा, क्रिएटिव्ह प्ले आणि अर्ली-लर्निंग अ‍ॅक्टिव्हिटीज करून शिकवलं जातं. वर्गाची वेळ सकाळी ८:४५ ते ११:४५ अशी आहे आणि शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून जूनच्या अखेरपर्यंत चालतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांना वर्षाला आठ ते नऊ लाख रुपये भरावे लागतात.
(फोटो सौजन्य – Batuhan Kocabaş/pexels.com)

सरकारी विरुद्ध खासगी शाळा

भारताप्रमाणेच अमेरिकेतसुद्धा खासगी आणि सरकारी अशा दोन प्रकारचं शिक्षण आहे. खासगी शाळा या अत्यंत महागड्या आहेत आणि सरकारी शाळांमध्ये किंडरगार्टन ते १२ ग्रेडपर्यंत शिक्षणासाठी ट्युशन फी आकारली जात नाही. पण लक्षवेधी बाब म्हणजे अमेरिकेतील बहुतांश पालक हे आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्येच पाठवतात. कारण तिथलं शिक्षण आणि सोयी-सुविधा या खासगी शाळांच्या तुल्यबळ आहेत. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा