Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे, अशी प्रार्थना साईबाबांकडे केल्याचं ठाकरे म्हणाले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उबाठातून फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्यावर आहेत. अखेरच्या दिवशी त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीत मेळावा घेत फुटीरांवर तोंडसुख घेतले. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनावेळी काय प्रार्थना केली, हे सांगताना ‘देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे’ असा मिश्कील टोला त्यांनी लगावला. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानातून नागपूरला प्रवास झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी व्यक्त केलेली उपहासात्मक चिंता हा टोमणा आहे की मदतीसाठी अप्रत्यक्षपणे मागितलेला हात, याची चर्चा रंगली आहे.
‘फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर’
मी शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन आल्यावर मीडियाने नेहमीप्रमाणे विचारलं, की काय प्रार्थना केलीत. मी म्हटलं, मी एकच प्रार्थना केली की या देशावर आणि राज्यवर जे एक संकट आलेलं आहे, ते अरिष्ट दूर कर, ही भ्रष्ट राजवट गाडून टाक, देशाला सुजलाम सुफलाम दिवस येवो. आणखी काय मागितलं, तर देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून माझ्या मनात भिरभिरतंय, हा निसर्गाचा नियम आहे, मी कोणाचं वाईट चिंतणारा नाही. कोणाचं वाईट व्हावं असं मला सुचत नाही, आणि सुचूही नये, अशी साईबाबांकडे प्रार्थना आहे. पण प्रत्येकाला शेवट असतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. Mumbai Crime : गिरगावात देह व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त, मराठी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रीची सुटका, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट रंगेहाथ सापडला
‘इतकं परेशान करा, की दिल्लीपर्यंत येऊच नयेत’
२०२९ मध्ये काय होणार आणि यांच्यानंतर आपल्याला वाली कोण, अशी चर्चा दिल्लीत सुरु झाली आहे. प्रत्येकाच्या मनात अंकुर फुटू लागले आहेत. तो झाला मी का नाही, रेसमध्ये देवेंद्र फडणवीस येऊ शकतात, म्हणून यांचा पत्ता आताच कापावा, असं काही जणांना वाटत आहे, त्यामुळे यांना इतकं परेशान करा, की हे दिल्लीपर्यंत येऊच नयेत. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कोण आहे, तुम्हाला माहितच आहे, त्यांनी शाहसेनेच्या प्रमुखाला सुपारी दिली आहे. मिंधे गट, एसंशि गट, की यांना गुंतवा इथे… असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
एक साधा हिशोब आहे, जर खासदार फुटत असतील, तर आपण स्वतःच्या पक्षात घेणार की दुसऱ्याच्या पक्षात पाठवणार, गेल्या निवडणुकीत किती खासदार निवडून आले, आपले ९ आले, भाजपचेही ९ आले आणि शाहसेनेचे ७ आले. शाहसेनेने आपले फोडले. म्हणजेच भाजपपेक्षा महाराष्ट्रात ताकद वाढली. उद्या पंतप्रधान पदाचा निर्णय घेण्याची वेळ आली, तर फडणवीसांना सांगतील तू गप्प बस, तुझ्या नेतृत्वात भाजपचे ९ आले, शाहसेनेचे १३ आहेत. अशी शाहसेनेची चाल आहे. फडणवीसांचे पंख छाटले जात आहेत. गडकरी-फडणवीसांसोबत सारखंच झालं आहे, असंही उद्धव म्हणाले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा