Who is Sachin Ahir? : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. ठाकरेंचे विश्वासू शिलेदार सचिन अहिर यांना आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश आलं आहे. सचिन अहिर नेमके कोण आहेत? ते जाणून घ्या

आदित्य ठाकरे मोठा धक्का
सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर आदित्य ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते त्यातील सचिन अहिर एक होते. मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण, खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती, समोर आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर तातडीनं शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे.
Sachin Ahir : ठाकरेंना सर्वात मोठा हादरा, सचिन अहिर यांनी शिवबंधन सोडलं, थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचं तिकीट, वरळीत राजकीय भूकंप
कोण आहेत सचिन अहिर?
मुंबईच्या राजकारणात सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. अहिर म्हणजे मुंबईत साजऱ्या केल्या जाणाऱ्या मोठ्या ‘दहीहंडी’ उत्सवासाठी ओळखलं जाणारं एक नाव आहे. आपल्या पत्नीसोबत सचिन अहिर ‘श्री संकल्प प्रतिष्ठान’ ही संस्था चालवतात. याच संस्थेमार्फत ते मोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतात. संपूर्ण वरळी परिसरात सचिन अहिर यांची संस्था लोकप्रिय आहे.
सचिन अहिर यांनी 1993 मध्ये ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’पासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला सचिव म्हणून काम पाहिल्यानंतर, त्यांची या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर, 1996 पासून त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघा’चं नेतृत्वही केलं आहे. माझगाव डॉक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या संस्थांमधील कामगार संघटनांचे नेतृत्व करताना, त्यांनी संबंधित उद्योगांमधील कामगारांसाठी वेतनवाढीचा करार घडवून आणला आणि कामगार चळवळीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला. या कामगिरीमुळे त्यांना गिरणगावात मोठी प्रसिद्धी मिळाली.
Sachin Ahir : ठाकरेंचे विश्वासू, विधान परिषदेवर संधी, तरी शिवबंधन का सोडलं? सचिन अहिरांच्या धक्कादायक निर्णयामागील कारण समोर
सचिन अहिर यांची राजकीय कारकिर्द
सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे वरळी विधानपरिषदेचे आमदार
विधानसभा निवडणुकीत तीनवेळा तर विधानपरिषदेवर एकदा विजयी झालेले
2009 ला गृहनिर्माण राज्यमंत्रिपदी
मामा अरुण गवळी सचिन अहिरांसमोर! दगडी चाळीत नेमकं काय घडलं?
26 जुलै 2019 ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल
2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती
2022 मध्ये विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती
30 जून 2026 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

