Headlines

Uday Samant: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी निधीचा पाऊस; 18 कोटी देण्याची मंत्री सामंत यांची घोषणा – uday samant annouces rs 18 cr for 100th marathi sahitya sammelan


Uday Samant: मराठी भाषा विभागातर्फे साहित्य परिषदेला एक कोटीच्या निधीचा धनादेश सामंत यांच्या हस्ते अध्यक्ष योगेश सोमण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

samant
उदय सामंत(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शंभराव्या साहित्य संमेलनासाठी पाच कोटी रुपये, या संमेलनानिमित्त होणाऱ्या ९९ नांदी संमेलनांसाठी पाच कोटी, १३ विद्यापीठांमध्ये होणाऱ्या विद्यार्थी संमेलनांसाठी प्रत्येकी २५ लाखांप्रमाणे चार कोटी, परदेशांतील १२ संमेलनांसाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) दोन कोटी, साहित्य परिषदेला एक कोटी याशिवाय पुस्तकांच्या दालनांसाठी आणि इतर उपक्रमांसाठी असा एकूण १८ कोटी रुपयांचा निधी मराठी भाषा विभाग देईल,’ अशा निधीच्या घोषणांचा पाऊस मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पाडला.

राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन आणि शंभराव्या साहित्य संमेलनाची संयोजक संस्था समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.
Maharashtra TimesPune News: दिल्ली आंदोलनातील दगडांवरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार; धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी
अनुवादासाठी निधी
‘साहित्याच्या अनुवादासाठी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावे अनुवाद समिती स्थापन केली जाणार आहे. इतर भाषांमधील साहित्य मराठीत आणि मराठीमधील साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी समितीतर्फे निधी देण्यात येईल,’ असे उदय सामंत यांनी सांगितले.

‘एनडीए’मध्ये शिंदे तिसऱ्या क्रमांकाचे नेते
‘दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास शिवसेनेला फरक पडणार नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदे हे तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. ते आता राष्ट्रीय पातळीवर काम करीत आहेत. एकनाथ शिंदे काय करू शकतात, हे महाराष्ट्राने त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात पाहिले आहे,’ अशी टिप्पणी उदय सामंत यांनी केली.

Maharashtra TimesMangesh Jagtap : ‘लग्न ठरलेलं, महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुक, शारीरिक संबंध’; पुणे जिल्हा परिषद सदस्याच्या प्रेमप्रकरणात मोठी अपडेट
शंभरावे मराठी साहित्य संमेलन हे जागतिक अद्भुत धाडस आहे. राज्य सरकारतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालासाठी दोन कोटी रुपये देण्यात येतात. पुण्यात होणारे शंभरावे साहित्य संमेलन जागतिक कीर्तीचे करण्यासाठी या संमेलनाला पाच कोटींचा निधी देण्यात येईल. –उदय सामंत, मराठी भाषा मंत्री

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा