Headlines

Two dead in accident of private bus carrying tourists to rajgad fort from mumbai several seriously injured; राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांच्या खासगी बसला अपघात; दोघांचा जागीच मृत्यू


Mumbai Tourists Accident: मुंबईती अंधेरी येथून पर्यटनासाठी पुणे जिल्ह्यात गेलेल्या पर्यटकांच्या बसला अपघात झाला असून दोन जणांनी आपला जीव गमावला आहे.

pune accident
राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांच्या खासगी बसला अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: मुंबईहून राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या खासगी बसला पुणे जिल्ह्यातील पाबे खाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवासी मृत्युमुखी पडले असून इतर काही जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात असून जखमी प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरातील जवळपास २० जण राजगड किल्ला पाहण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघाले होते. मात्र त्यांची खासगी बस हवेली आणि वेल्हा तालुक्यात जोडणाऱ्या पाबे घाटात पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट घाटातील दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की बसमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताबाबतची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवत जखमींना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढलं. यातील दोन जणांनी जागीच आपले प्राण गमावले असून काही जणांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर गड-किल्ल्यांवर पर्यटकांची रीघ लागते. मात्र अशावेळी अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडताना नागरिकांनी सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असते. तसंच मागील काही महिन्यांत राज्यात घाटरस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घाटरस्त्यावर वाहन चालवताना चालकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासकडून करण्यात आलं आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा