Beed Crime: बीडमधल्या धक्कादायक घटनेने सध्या सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. एका चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. तिला नदीमध्ये फेकून देण्यात आले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील खासबाग परिसरातील बिंदूसरा नदीपात्रात आज दुपारी तीन ते चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची सध्या शहरवासियांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या निष्पाप चिमुकलीला तीन-चार दिवसांआधी या नदीपात्रात फेकून देण्यात आले असावे असा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, चिमुकलीचा मृतदेह सर्वात प्रथम मासेमारी करणाऱ्या नागरिकांना दिसला. त्यांना तिच्या शरीराचे काही भाग फाटलेले असल्याचे आढळले, हे दृश्य अतिशय हृदयद्रावक होते, असे या नागरिकांनी सांगितले आहे.
मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे एपीआय राठोड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात तपासणीसाठी पाठवला आहे. दरम्यान, पोलिस तपासानुसार, मुलीच्या अंगात गुलाबी रंगाचा फ्रॉक होता तसेच हातात काळ्या-पिवळ्या मण्यांच्या मनगट्या होत्या. एवढ्या गोंडस बाळाला पाण्यात कोणी आणि का टाकले? असावे असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
चिमुकलीला बिंदुसरा नदीवरील पुलावरून फेकण्यात आले की कोणी नदीत उतरून ठेवले, याबाबतही तपास सुरू आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या निर्दयी कृतीचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.
Dharashiv News: संग्राम जगताप पुन्हा ती भूमिका घेणार नाहीत – दत्ता भरणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे मुस्लिम विरोधी वारंवार भूमिका घेत होते, पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्यांना समज देऊन देखील त्यांनी मुस्लिम विरोधी भूमिका कायम ठेवली होती. आमदार संग्राम जगताप यांना पक्षाच्या बैठकीमध्ये अजितदादांनी सांगितल आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप हे पुन्हा ती भूमिका घेणार नाहीत, असं वक्तव्य पक्षाचे नेते तथा मंत्री दत्ता भरणेंनी केलं आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा