Headlines

Tukaram Mundhe Makes Tea for Friends Netizens Call It FDA Approved Tea | ‘तुकाराम मुंढे कोणत्या कंपनीचं दूध वापरतात?’ मित्रांसाठी चहा बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल, २४ तासांत मिळाले १ कोटी व्ह्यूज


Tukaram Mundhe’s Tea-Making Video Goes Viral: FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मित्रांसाठी चहा बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी एका पेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Tukaram Mundhe
(फोटो सौजन्य – rohanbhamkar/Instagram)
महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या खूपच चर्चेत आहेत. खरं तर ते आपल्या धडक कारवाईमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना पाहून भ्रष्ट अधिकारी थरथर कापतात, अशी त्यांची ओळख आहे. पण FDA आयुक्तपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळयुक्त अन्न, प्रतिबंधित पदार्थ आणि अस्वच्छ अन्ननिर्मितीविरोधात केलेली कारवाई हा सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. पण गंमत म्हणजे, या चर्चेच्याच पार्श्वभूमीवर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते आपल्या मित्रांसाठी चहा बनवताना दिसत आहेत. अन् नेटकरी या व्हिडीओवर एकापेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. लोक या चहाला ‘FDA अप्रूव्ह्ड चहा’ म्हणत आहेत.

मित्रांसाठी स्वतः केला चहा

​ ​

हा व्हिडीओ rohanbhamkar या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ते भाऊ अशोक मुंढे आणि मित्रांसाठी चहा बनवताना दिसत आहेत. वास्तविक, ही काही उल्लेखनीय गोष्ट नाही. किंबहुना, ती एक खासगी बाब आहे. पण मुंढे हे कायम कठोर प्रशासकीय भूमिकेसाठी ओळखले जातात. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे ते चर्चेत असतात. आणि आता मोठमोठ्या नावाजलेल्या रेस्टॉरंट्समधील भेसळयुक्त पदार्थ एक्सपोज केल्यामुळे लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः तयार केलेला चहा हा नेटकऱ्यांसाठी सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

नेटकरी काय म्हणताहेत?

नेटकरी काय म्हणताहेत?

या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच ४ हजारांहून अधिक प्रतिक्रियाही लोकांनी दिल्या आहेत. कोणी विचारतंय, ‘सर, चहामध्ये तुम्ही दूध कुठलं वापरता ते सांगा, म्हणजे आम्ही सुद्धा तेच दूध घरी मागवू.’ तर कोणी गंमतीनं विचारतंय, ‘सर, हा चहा FDA अप्रूव्ह्ड आहे का?’ असो, या व्हिडीओवर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? तुम्ही देखील आपले विचार व्यक्त करा.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा