Headlines

tukaram mundhe fda statewide raid 13 arrested 4 hotel licences suspended; ताटातील अन्नातही भेसळ! 4 हॉटेल्सचे परवाने जागेवर निलंबित, 13 जणांना उचललं, FDAची राज्यात कुठे-कुठे कारवाई?


FDA Action Maharashtra : FDAने राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत दूध, दुग्धजन्य पदार्थ, पान मसाला आणि इतर अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली. लाखो रुपयांचा साठा जप्त झाला, अनेकांवर गुन्हे दाखल झाले आणि काही हॉटेल्सवरही कठोर कारवाई झाली. या संपूर्ण मोहिमेतील कारवाईचे आकडे आणि जिल्हानिहाय कारवाईची ए टू झेड माहिती जाणून घ्या.

tukaram mundhe latest news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : नागरिकांच्या ताटात भेसळयुक्त अन्न पोहोचू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर धडक मोहीम राबवली. केवळ एका दिवसात दूध, दुग्धजन्य पदार्थ, पान मसाला, मसाले, खाद्यतेल आणि बेकरी पदार्थांवर कारवाई करत लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून २६ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

९ जुलै रोजी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत पाच ठिकाणी तपासणी करून २,२०९ किलो दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा ७.९२ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित पान मसाल्याच्या विक्री, वितरण आणि वाहतुकीप्रकरणी आठ गुन्हे दाखल करण्यात आले असून १३ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत ४१.०६ लाख रुपयांचा पान मसाल्याचा साठाही जप्त करण्यात आला.

याशिवाय मसाले, बेकरी पदार्थ आणि खाद्यतेलावरही कारवाई करण्यात आली. राज्यातील आठ आस्थापनांवर धाड टाकून १४.९२ लाख रुपयांचा सुमारे १२,८८५ किलो साठा जप्त करण्यात आला.

Maharashtra TimesTukaram Mundhe FDA Action : 72 तास, 5 शहरं आणि 90.42 लाखांचा साठा; मुंढेंच्या FDAनं आरोग्याशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश केला, नेमकं काय-काय जप्त?

घाटकोपरमधील दुग्धालयाचा परवाना निलंबित

घाटकोपर पश्चिम येथील गौतम दुग्धालयात तपासणीदरम्यान १६० किलो बासुंदी, २१० लिटर कच्चे दूध आणि १६० किलो आईस्क्रीम असा एकूण ५३० किलो साठा जप्त करण्यात आला. लेबलिंग नियमांचे उल्लंघन, अस्वच्छ साठवणूक आणि आवश्यक शीतसाखळी न पाळल्याचे आढळल्याने संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला.

अहमदनगर, लातूर, नवी मुंबईतही कारवाई

अहमदनगर जिल्ह्यातील दोन दूध उत्पादकांवर कारवाई करून निकृष्ट दर्जाचे दूध जप्त करण्यात आले. लातूरमध्ये भेसळयुक्त दूध वाहतूक करणारे वाहन पकडून त्यातील संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला. तर नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

हॉटेल्सवरही कारवाई

राज्यातील ५८ हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २६ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर पुणे, नाशिक आणि धुळे येथील मिळून चार आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

Maharashtra TimesMaharashtra Rain Alert : पुढील 5 दिवस राज्यातलं हवामान कसं? पावसाची क्षणभर विश्रांती की धुमाकूळ? ‘या’ गोष्टीचा परिणाम दिसणार

अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवली जाईल, असा इशारा दिला आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा