Tukaram Mundhe FDA Chief Pune Local Interview Next Target Chinese Food; पुण्यात पहिलं रिजेक्शन, तुकाराम मुंढे यांचा किस्सा, पाषाण रोडला पहिलं चायनीज खाललं, तिथे जाऊन यावं म्हणतो, FDA आयुक्तांनी सूचकपणे पुढचं टार्गेट सांगितलं
Tukaram Mundhe FDA Chief Pune Local Interview Next Target Chinese Food; पुण्यात पहिलं रिजेक्शन, तुकाराम मुंढे यांचा किस्सा, पाषाण रोडला पहिलं चायनीज खाललं, तिथे जाऊन यावं म्हणतो, FDA आयुक्तांनी सूचकपणे पुढचं टार्गेट सांगितलं
Tukaram Mundhe FDA on Chinese Food : “पुण्यात पाषाण रोडला चायनीजच्या गाड्या असायच्या. मी आता विचार केला, की जाऊन बघावं का. आश्चर्य वाटेल, पण माझं पहिलं चायनीज फूड मी तिथेच खाललं होतं. चायनिज काय हे तोपर्यंत माहिती नव्हतं. चायनिजकडेही लक्ष द्या असं सगळे म्हणत आहेत.” असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.
तुकाराम मुंढे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रकट मुलाखत पुण्यात लेखक अरविंद जगताप यांनी घेतली. पुण्यात मिळालेलं पहिलं रिजेक्शन, आवडतं स्ट्रीट फूड, पुढचं टार्गेट यासारख्या विविध विषयांवर मुंढेंनी दिलखुलास गप्पा मारल्या. पुण्याबाबत एक गमतीशीर गोष्ट म्हणजे तुम्ही एमए शिकायला आलात तेव्हा, पहिलं रिजेक्शन तुम्हाला मिळालं. विद्यापीठ हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही, असा प्रश्न अरविंद जगताप यांनी विचारला, तेव्हा तुकाराम मुंढे यांनी सविस्तर सांगितलं.
पुण्यातील पहिला अनुभव
“बीए झाल्यानंतर एमएला अॅडमिशन घेण्यासाठी मी पुण्यात आलो. एसटी महामंडळाच्या लालपरी बसने सकाळी उतरलो. त्याआधी पुण्याला कधीच आलो नव्हतो. शिवाजीनगर बस स्टँडला उतरलो. तिथून पायी विद्यापीठात गेलो, कारण काहीच माहिती नव्हतं. मी राज्यशास्त्र विभागात एमसाठी गेलो. तिथे अर्ज भरला, मार्कशीट दाखवली. तर स्टाफने सांगितलं की इथे प्रवेश मिळेल पण हॉस्टेल मिळणार नाही. चार पाच हॉस्टेल आधीच बुक झाली होती. मी म्हटलं की मी दुसरीकडे कुठेच राहू शकत नाही. मग ते म्हणाले, तुम्ही एसपी कॉलेजला प्रयत्न करा, बीएला मार्क्स चांगले असल्याने तिथेही प्रवेश मिळत होता. पण पुन्हा वसतिगृहाचा प्रश्न होता. त्यामुळे संध्याकाळच्या बसने घरी जायचं ठरलं. माझा पुण्याचा पहिला प्रवास बस स्टँड-विद्यापीठ-एसपी कॉलेज-बस स्टँड इतकंच झालं.” असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
“पुढे अॅडमिशन झालं की नाही झालं, हॉस्टेल लागलं का याचाही मी विचार नाही केला. मी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला. यूपीएससी करताना एमए केलं. हॉस्टेलला किती जागा आहेत, किती मुलांनी अर्ज केला, असे काहीही प्रश्न मी विचारले नाहीत, कारण माझ्या मनात दुसरंच द्वंद्व सुरु होतं. बीए होईपर्यंत मी घराबाहेर कधी पडलो नव्हतो. गावाबाहेर होतो, पण त्यावेळच्या औरंगाबादला भावासोबत राहत होतो. कुटुंबातील व्यक्तींशिवाय स्वतंत्र कधी राहिलो नव्हतो. बीए झाल्यानंतरही एकटं, घरापासून दूर राहणार कसं, ही अनामिक भीती होती. यूपीएससीची तयारी करताना जयकर लायब्ररीत अभ्यास करत होतो. माझा एक मित्र पुणे विद्यापीठात राज्यशास्त्रात एमए करत होतो. त्याच्या रुमवर शेअरिंग बेसिसवर राहत होतो. तिथे ढेकणं इतकी होती, की झोपच यायची नाही. मी त्याला म्हटलं आधी सांगितलं असतं तर कधी आलोच नसतो. पुण्याशी माझी अशी ओळख झाली.” असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
चायनिज फूड पुढचं टार्गेट
“बापट रोड किंवा पाषाण रोडला चायनीजच्या गाड्या असायच्या. मी आता विचार केला, की जाऊन बघाव्यात का. आश्चर्य वाटेल, पण माझं पहिलं चायनीज फूड मी तिथेच खाललं होतं. चायनिज काय हे तोपर्यंत माहिती नव्हतं. इंडिया चायना वॉर वगैरे अभ्यास मी केला होता. पण चायनिज फूडचा अभ्यास केला नव्हता. आता खूप डिमांड आहे. गेल्या दोन महिन्यात ज्या कारवाया झाल्या, त्यानंतर चायनिजकडेही लक्ष द्या म्हणत आहेत. चायनिज फूडकडे थोडं लक्ष द्यायचं आहे.” असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.
“आवडत स्ट्रीट फूड होतं असं म्हणूया. कधी कधी कंडिशनिंगमध्ये काही गोष्टी आवडून घ्याव्या लागायच्या. प्रॉपर जेवण मिळायचं नाही. संभाजीनगरला भेळ, आमलेट पावच्या गाड्या लागायच्या. कारण गावाकडे कधी आमलेट बनवलं नव्हतं, तेव्हा आमलेट पहिल्यांदा समजलं. मग ते माझं नेहमीचं खाणं झालं होतं. फरसाण आणि केळी माझं स्टेपल फूड झालं होतं, आता जर मी ते खाण्याचा प्रयत्न केला, तर दोन तासात बोलूही शकणार नाही, घसा एकदम पॅक होईल. त्यावेळी इम्युनिटी होती. आता विचार करतो, तेल काय वापरत असतील, कसं खात होतो मी, आता तिथे गेलो तर काय होईल. आता मला कुठलंही स्ट्रीट फूड आवडत नाही. गेल्या दोन महिन्यात अजिबात आवडत नाही” असंही मुंढे म्हणाले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा