Headlines

Tukaram Mundhe advices Youth to handle Social Media with care use AI cautiously; एआय वाईट नाही, पण वापरावर यश अवलंबून; तुकाराम मुंढेंचा सल्ला, सोशल मीडियावर दिसतं म्हणून प्रत्येक रील खरं नसतं


Nagpur News : डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल; मात्र मोबाइलने आपल्याला वापरावे की आपण मोबाइलचा वापर करावा, हे ठरवावे लागणार असल्याचं अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले

Tukaram Mundhe Nagpur Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘ एआय वाईट नाही; मात्र त्याचा वापर आपण कसा करतो, यावर यशाचे परिमाण ठरते. सध्या विचारांचे युद्ध सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारांची भेसळ केली जात आहे. त्यामुळे विचारशून्य होऊ नका. गोंगाटाचा भाग होऊ नका. क्षणभर विश्रांती घ्या आणि विचार करा. प्रवाहाला योग्य दिशा द्या’, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

‘स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्ट’तर्फे रविवारी आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आयपीएस अधिकारी संदीप तामगाडगे होते. तामगाडगे ट्रस्टच्या अध्यक्ष कुसुम तामगाडगे, कस्टम विभागाचे आयुक्त उन्मेष वाघ, प्राप्तिकर विभागाचे आयुक्त धनंजय वंजारी, आरबीआयचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे, पाली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बुद्धिस्ट स्टडी विभागाचे प्रमुख नीरज बोधी उपस्थित होते.
Maharashtra TimesRohit Sharma : 17 व्या वर्षी उभारलेलं ‘चायवालाज्’ अचानक बंद, मग अध्यात्मात झोकून दिलं; युवा उद्योजक रोहित शर्मांचा चटका लावणारा शेवट

स्वतःची बुद्धी शाबूत ठेवा

‘तंत्रज्ञानामुळे काळ झपाट्याने बदलला आहे. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल; मात्र मोबाइलने आपल्याला वापरावे की आपण मोबाइलचा वापर करावा, हे ठरवावे लागेल. स्वतःची बुद्धी शाबूत ठेवा. ज्ञानापासून विवेकापर्यंतची पायरी चढण्याची गरज आहे. सोशल मीडियावर दिसते म्हणून रील खरे असतेच असे नाही. प्रश्न पडू द्या, त्याचा उगम कुठून झाला, याचा शोध घ्या’, असे सांगत तुकाराम मुंढे यांनी डिजिटल युगाच्या दुष्परिणामांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा; सर्व क्षेत्रात वजन कमी झाल्याची खदखद मांडली

स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यावेळी ‘स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती’ आणि सिकलसेलग्रस्त मुलींना वैद्यकीय-शैक्षणिक सहकार्यासाठी ‘अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती’ वितरित करण्यात आली. या उपक्रमातून ५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सूत्रसंचालन समाजकल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले, तर आभार स्वप्निल निखाडे यांनी मानले.
Maharashtra TimesPune Crime : ऑनलाईन औषध मागवून घरभर धूर केला, पिंपरीत उच्चशिक्षित कुटुंबाचा वेदनादायी अंत, पित्यामागून मायलेकही मृत्युमुखी

केवळ डिग्री नको, कौशल्यही हवे

केवळ डिग्री घेऊन उपयोग नाही; कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. जीवनभर शिकण्याची सवय लावा. मशिनचा वापर कसा आणि कोणत्या उद्देशासाठी करतो, याचे तारतम्य बाळगा; अन्यथा आपण गुलामगिरीत जाऊ, असा इशाराही मुंढे यांनी दिला. सिकलसेलबाबत जनजागृतीची गरज असून लग्नापूर्वी तपासण्या आवश्यक आहेत, असे संदीप तामगाडगे म्हणाले. अभ्यास करताना मित्र बनवा; पुढे येणाऱ्या अडचणीच्या वेळी मित्रच धावून येतात, असे उन्मेष वाघ यांनी सांगितले. आयुष्यात नवीन वाटा शोधण्याची तयारी ठेवा, असा सल्ला नीरज बोधी यांनी दिला.