Tukaram Mundhe advices Youth to handle Social Media with care use AI cautiously; एआय वाईट नाही, पण वापरावर यश अवलंबून; तुकाराम मुंढेंचा सल्ला, सोशल मीडियावर दिसतं म्हणून प्रत्येक रील खरं नसतं
Tukaram Mundhe advices Youth to handle Social Media with care use AI cautiously; एआय वाईट नाही, पण वापरावर यश अवलंबून; तुकाराम मुंढेंचा सल्ला, सोशल मीडियावर दिसतं म्हणून प्रत्येक रील खरं नसतं
Nagpur News : डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल; मात्र मोबाइलने आपल्याला वापरावे की आपण मोबाइलचा वापर करावा, हे ठरवावे लागणार असल्याचं अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘ एआय वाईट नाही; मात्र त्याचा वापर आपण कसा करतो, यावर यशाचे परिमाण ठरते. सध्या विचारांचे युद्ध सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारांची भेसळ केली जात आहे. त्यामुळे विचारशून्य होऊ नका. गोंगाटाचा भाग होऊ नका. क्षणभर विश्रांती घ्या आणि विचार करा. प्रवाहाला योग्य दिशा द्या’, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
‘स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्ट’तर्फे रविवारी आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आयपीएस अधिकारी संदीप तामगाडगे होते. तामगाडगे ट्रस्टच्या अध्यक्ष कुसुम तामगाडगे, कस्टम विभागाचे आयुक्त उन्मेष वाघ, प्राप्तिकर विभागाचे आयुक्त धनंजय वंजारी, आरबीआयचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे, पाली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बुद्धिस्ट स्टडी विभागाचे प्रमुख नीरज बोधी उपस्थित होते. Rohit Sharma : 17 व्या वर्षी उभारलेलं ‘चायवालाज्’ अचानक बंद, मग अध्यात्मात झोकून दिलं; युवा उद्योजक रोहित शर्मांचा चटका लावणारा शेवट
स्वतःची बुद्धी शाबूत ठेवा
‘तंत्रज्ञानामुळे काळ झपाट्याने बदलला आहे. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल; मात्र मोबाइलने आपल्याला वापरावे की आपण मोबाइलचा वापर करावा, हे ठरवावे लागेल. स्वतःची बुद्धी शाबूत ठेवा. ज्ञानापासून विवेकापर्यंतची पायरी चढण्याची गरज आहे. सोशल मीडियावर दिसते म्हणून रील खरे असतेच असे नाही. प्रश्न पडू द्या, त्याचा उगम कुठून झाला, याचा शोध घ्या’, असे सांगत तुकाराम मुंढे यांनी डिजिटल युगाच्या दुष्परिणामांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा; सर्व क्षेत्रात वजन कमी झाल्याची खदखद मांडली
स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यावेळी ‘स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती’ आणि सिकलसेलग्रस्त मुलींना वैद्यकीय-शैक्षणिक सहकार्यासाठी ‘अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती’ वितरित करण्यात आली. या उपक्रमातून ५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सूत्रसंचालन समाजकल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले, तर आभार स्वप्निल निखाडे यांनी मानले. Pune Crime : ऑनलाईन औषध मागवून घरभर धूर केला, पिंपरीत उच्चशिक्षित कुटुंबाचा वेदनादायी अंत, पित्यामागून मायलेकही मृत्युमुखी
केवळ डिग्री नको, कौशल्यही हवे
केवळ डिग्री घेऊन उपयोग नाही; कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. जीवनभर शिकण्याची सवय लावा. मशिनचा वापर कसा आणि कोणत्या उद्देशासाठी करतो, याचे तारतम्य बाळगा; अन्यथा आपण गुलामगिरीत जाऊ, असा इशाराही मुंढे यांनी दिला. सिकलसेलबाबत जनजागृतीची गरज असून लग्नापूर्वी तपासण्या आवश्यक आहेत, असे संदीप तामगाडगे म्हणाले. अभ्यास करताना मित्र बनवा; पुढे येणाऱ्या अडचणीच्या वेळी मित्रच धावून येतात, असे उन्मेष वाघ यांनी सांगितले. आयुष्यात नवीन वाटा शोधण्याची तयारी ठेवा, असा सल्ला नीरज बोधी यांनी दिला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा