औषधांवर ट्रम्प टॅरिफ बॉम्ब
पहिल्या दोन वर्षांसाठी या औषधांवर शून्य आयात शुल्क लादले जाणार असले तरीही दोन वर्षांनंतर पहिल्या वर्षी 100% शुल्क आकारले जाईल, त्यानंतर 200% पर्यंत वाढवले जाईल. राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, या धोरणाचा उद्देश अमेरिकेच्या जनतेचे संरक्षण करण्याचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्याणाचा उद्देश अशा औषधी उत्पादनांचे उत्पादन देशांतर्गत (अमेरिकेतच) करण्याचा असून या निर्णयाचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे, कारण भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधांची सर्वाधिक निर्यात करतो.
Bab el-Mandeb Blocked: होर्मुझनंतर आता ‘अश्रूंचे द्वार’ रडवणार, हुती बंडखोरांकडून समुद्री नाकेबंदी जाहीर; भारतासाठी किती गंभीर?
ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतला
अमेरिकेत औषध निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा ट्रम्प यांच्या निर्णयामागील मुख्य कारण आहे. ट्रम्प म्हणतात की परदेशी कंपन्यांना सुरुवातीला सवलती दिल्यास अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कारखाने उभारले जातील, ज्यामुळे भविष्यात देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर औषध उत्पादन शक्य होऊ शकेल. अशा परिस्थितीत, ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, ज्या कंपन्या 2 वर्षांच्या आत अमेरिकेत स्वतःचे कारखाने उभारण्यात अयशस्वी ठरतील, त्यांना मोठ्या शुल्काचा सामना करावा लागेल.
जेनेरिक औषधांवरील अमेरिकेच्या टॅरिफचा भारतावर परिणाम
भारत जगभरातील देशांना जेनेरिक औषधांचा पुरवठा करतो त्यामुळे आपल्याला ‘जगाची फार्मसी’ म्हटले जाते. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांपैकी जवळपास 40% औषधे भारतात बनतात. 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला 9.7 अब्ज डॉलर्स किमतीची औषधे निर्यात केल्याचे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालावरून समोर आले, जी भारताच्या एकूण 25.8 अब्ज डॉलर्सच्या जागतिक औषध निर्यातीपैकी 38% इतकी होती.
अशा परिस्थितीत, ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफचा भारतीय औषध कंपन्यांवर नेमका काय परिणाम होईल? याबाबत सुरुवातीला चित्र स्पष्ट करणे घाईचे ठरेल. भारत आणि अमेरिका यांच्यात फेब्रुवारीमध्ये झालेल्या करारानुसार ‘ जेनेरिक औषधे आणि त्यातील घटक यांच्याबाबत वाटाघाटींद्वारे निश्चित झालेली फलिते’ भारताला मिळणे अपेक्षित आहे.
C Vijayakumar: भारतीय IT उद्योगातील सर्वात महागडे CEO, महिन्याला 48 लाख पगार; ना TCS, ना इन्फोसिस, तिसऱ्याच कंपनीचा सीईओ सर्वात धनवान
त्याचवेळी, ट्रम्प यांच्या औषध पुरवठादारांवर शुल्क आकारण्याच्या पूर्वीच्या धमक्यांमुळे भारतातून होणारा स्वस्त पुरवठा धोक्यात आला होता. उच्च रक्तदाब, नैराश्य, मधुमेह, कर्करोग, संसर्गजन्य रोग आणि मानसिक आरोग्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधे पुरवतो.
फायनान्शियल पोस्टच्या अहवालानुसार, 2024 मध्ये अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांसाठी लिहून दिलेल्या एकूण प्रिस्क्रिप्शन्सपैकी सुमारे 65% औषधांचे उत्पादन केवळ दोन भारतीय कंपन्यांनी—ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि ल्युपिन लिमिटेड—केले होते.

