टाटा स्टॉकमध्ये विक्रीचा सपाटा
टाटा समूहाची रिटेल कंपनी- Trent लिमिटेडच्या शेअर्समध्ये मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात 10 टक्क्यांहून जास्त घसरण झाली. कंपनीने जून तिमाहीचा अहवाल प्रसिद्ध केला, जो बाजाराच्या अपेक्षांपेक्षा कमी पडला आणि गुंतवणूकदार आता स्टॉक विकून पळ काढू लागले आहेत. स्टोअर नेटवर्कमध्ये सतत वाढ होत असूनही पहिल्या तिमाहीच्या अहवालानंतर ब्रोकरेज कंपन्यांनी सावधगिरीचा सल्ला जारी केला.
Gold Rates Today: सोन्याच्या दरानं अचानक बदलली चाल… चांदीही चमक फिकी पडली! खिसा रिकामा करण्यापूर्वी पाहा आजचा दर
सोमवारी 3,343.80 रुपयांवर क्लोज झालेला ट्रेंट लिमिटेडचा स्टॉक मंगळवारी सकाळी 3,080 रुपयांवर उघडला. यानंतर स्टॉक आणखी घसरला आणि 10 टक्के घसरून 3,030 वर आला. अशा परिस्थितीत, एवढ्या मोठ्या घसरणीनंतर कंपनीने असं काय म्हटले की गुंतवणूकदारांनी अचानक शेअर्स विक्री सुरू केली? असा प्रश्न निर्माण झालं.
Saudi Oil Price Cut: तेलाच्या खेळात सौदी अरेबियाची बाजी! भारताच्या मित्राने वाढत्या किमतीतवर केला 26 वर्षांतील सर्वात मोठा ‘स्ट्राईक’
ट्रेंटने नेमकं काय म्हटले?
शेअर मार्केट फायलिंगमध्ये कंपनीने सांगितले की जून तिमाहीत कंपनीने 5666 कोटी रुपयांचा स्वतंत्र महसूल कमवला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील 4781 कोटींच्या तुलनेत जास्त आहे. म्हणजे कंपनीच्या महसुलात वार्षिक (YoY) 19% वाढ झाली आहे. वरवर पाहता 19% वाढ चांगली वाटते, पण शेअर बाजार केवळ वाढच पाहत नाही, तर ही वाढ बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही.
टाटांच्या स्टॉकमध्ये घसरणीचे कारण काय
कंपनीची मंद वाढ ट्रेंटच्या शेअरमधील मोठ्या घसरणीचे सर्वात मोठे कारण ठरले. सलग पाच तिमाहींमध्ये प्रथमच महसुलातील वाढ 20% पेक्षा कमी राहिली, ज्यामुळे गुंतवणूकदार निराश झाले. त्याचप्रमाणे, नवीन वेस्टसाइड स्टोअर्सची सुरुवातही अपेक्षेपेक्षा कमी होती, तर बाजाराला अधिक स्टोअर्स सुरू होण्याची अपेक्षा होती पण कंपनीने त्या आघाडीवर निराशा केली. अशा परिस्थितीत, कमकुवत वाढ आणि स्टोअर विस्ताराची मंद गती दिसू लागताच गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यास सुरुवात केली, ज्यामुळे शेअरमध्ये मोठी विक्री झाली.
शेअर बाजाराची स्थिती काय
दुसरीकडे, देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये एकूणच संथगतीने वाढ होताना दिसत आहे. मंगळवार, 7 जुलै रोजी, साप्ताहिक एक्स्पायरीच्या दिवशी बाजार तेजीच्या हिरव्या रंगात उघडला तर, निफ्टीने सुरुवातीच्या व्यवहारात सोमवारचा उच्चांक मोडला आणि 24,488 अंकांवर पोहोचला. तसेच मुंबई शेअर बाजार 113 अंकांनी वाढून 78,403 अंकांवर व्यवहार करत असताना बँक निफ्टी 168 अंकांनी वाढून 58,490 अंकांवर व्यवहार करत आहे.
त्याचवेळी, IT स्टॉक्समध्ये पुन्हा एकदा खरेदीचा कल दिसून येत असून निफ्टी IT निर्देशांक 1% वधारला. याव्यतिरिक्त PSUs, रिअल्टी आणि वित्तीय स्टॉक्समध्येही खरेदीचा कल दिसून येत आहे.

