Headlines

Train AC Not Working Passengers Garbage Found Clogged Inside AC Duct Video Viral | ‘चौपट पैसे घेतात पण AC ची हवा लागत नाही’, ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल, AC डक्ट उघडताच सापडला कचऱ्याचा ढीग


AC ट्रेनसाठी चौपट तिकीट काढून सुद्धा थंड हवा लागत नाही, अशी तक्रार प्रवासी करत होते. पण जेव्हा या AC डक्टची तपासणी केली, तेव्हा त्यामध्ये कचरा सापडला. सार्वजनिक मालमत्ता आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी नागरिकांनीही स्वीकारणे गरजेचे आहे. असा संदेश या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

New Project (13)
सिव्हिक सेन्सच्या बाबतीत भारतीय लोकांवर अनेकदा टीका केली जाते. कारण अनेकदा सुशिक्षित लोकं सुद्धा फार विचित्र वागतात. अन् याच गोष्टीची प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. AC ट्रेनमध्ये हवा लागत नाही, अशी तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जाते. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं कर्मचारी पाठवून AC डक्टची तपासणी केली. अन् आश्चर्य म्हणजे या AC डक्टमध्ये चक्क प्रवाशांनी कोंबलेला कचरा सापडला. या कचऱ्यामुळे AC ची हवा पुढे सरकत नाही अन् परिणामी डब्यातील तापमान वाढतं.
(फोटो सौजन्य – @SantaniSubhajit/x.com)

AC डक्टमध्ये सापडला कचरा

हा व्हिडीओ @SantaniSubhajit या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वे कर्मचारी ट्रेनमधील AC ची तपासणी करत आहे. त्यानं AC ची जाळी काढली, त्यावेळी त्याला त्यामध्ये कचरा सापडला. लोकांनी नाश्त्याची रिकामी पाकिटं, पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा, जो वास्तविक कचरापेटीत फेकणं अपेक्षित असतं, तो त्यांनी या जाळीमध्ये कोंबून ठेवला. त्यामुळे AC मधून व्यवस्थित हवा बाहेर येत नव्हती. हा सगळा कचरा कर्मचाऱ्यानं बाहेर काढला आणि मग तो AC डक्ट व्यवस्थित स्वच्छ केला.

या परिस्थितीला जबाबदार कोण?

AC ची हवा लागत नसेल तर आपण रेल्वे प्रशासनाला दोष देतो. पण सुविधा चांगल्या हव्या असतील, तर सर्वप्रथम आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. असा संदेश या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तसंच, हा व्हिडीओ ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय आणि नेटकऱ्यांनी सुद्धा त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा