टाटा नेक्सॉन सेल्स जानेवारी २०१८ ते २०२५
| Financial Year | टाटा नेक्सॉन सेल्स | चेंज % |
| FY2018 | 27,547 | – |
| FY2019 | 55,008 | 99.69% |
| FY2020 | 43,260 | -21.36% |
| FY2021 | 63,756 | 47.38% |
| FY2022 | 1,24,130 | 94.70% |
| FY2023 | 1,72,138 | 38.68% |
| FY2024 | 1,71,929 | -0.12% |
| FY2025* | 1,46,723 | -7% |
| टोटल | 8,04,491 | – |
जानेवारी २०१८ पासून २०२५ पर्यंत टाटा नेक्सॉनच्या विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, आर्थिक वर्ष २०१८ मध्ये नेक्सॉनने २७,५४७ युनिट्स सेल्स केले. २०१९ मध्ये ५५,००८ युनिट्स सेल केले.२०२० मध्ये ४३,२६० युनिट्स सेल केले आणि त्यात २१.३६% ची घट झाली. २०२१ मध्ये ६३,७५६ युनिट्स सेल केले ज्यात ४७.३८% वाढ झाली. २०२२ मध्ये १,२४,१३० युनिट्स सेल केले ज्यात ९४.७०% वाढ झाली. २०२३ मध्ये १,७२,१३८ युनिट्स सेल केले ज्यात ३८.६८% वाढ झाली. २०२४ मध्ये १,७१,९२९ युनिट्स सेल केले ज्यात -०.१२% ची घट झाली. २०२५ मध्ये आतापर्यंत १,४६,७२३ युनिट्स सेल केले आहे ज्यात -७% ची घट झाली. अशाप्रकारे, या आर्थिक वर्षात नेक्सॉनने ८,०४,४९१ युनिट्सची विक्री केली आहे.
टाटा नेक्सॉन 2025 चे मॉडेल आधीच्या व्हेरिएंटसारखे आहे. परंतु टाटाने निवडक ट्रिम लेव्हल्समध्ये (पर्सोनास) फीचर जोडली आहेत. स्मार्ट, प्युअर+, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह+ पीएस आणि फियरलेस+ पीएस हे असे व्हेरिएंट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. स्मार्ट+ ट्रिममध्ये व्हील कॅप्स जोडण्यात आल्या आहेत. प्युअर ट्रिमसह, टाटा किंमत वाढवण्यासाठी अधिक चांगली फीचर देत आहे. आता त्यात बॉडी-कलर आउटसाईड डोअर हँडल, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह १०.२-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, हाईट-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ऑटो-फोल्ड ORVMS चा समावेश आहे.
क्रिएटिव्ह ट्रिममध्ये अनेक फीचर्स दिली आहेत. प्रमुख अॅड-ऑन्समध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह १०.२-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, ३६०-डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल आणि पुश-बटण स्टार्ट यांचा समावेश आहे. टॉप-स्पेक फियरलेस +पीएस ट्रिममध्ये पॅनोरॅमिक सनरूफ आहे. कंपनीने क्रिएटिव्ह + पीएस देखील अपडेट केले आहे. क्रिएटिव्ह ट्रिममध्ये आता PS मिळते, म्हणजेच त्याला पॅनोरॅमिक सनरूफ मिळेल. क्रिएटिव्ह + पीएस ट्रिममध्ये वायरलेस चार्जर, कॉर्नरिंग फंक्शनसह फ्रंट फॉग लॅम्प, रिअर ऑक्युपंट डिटेक्शनसह 60:40 स्प्लिट रिअर बेंच सीट्स आणि रिअर डिफॉगर चा समावेश आहे.
नेक्सॉन सीएनजीमध्ये १.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे ९८.५ बीएचपी आणि १७० एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन फक्त ६-स्पीड एमटीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये टाटाच्या ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये सीएनजी टँकची एकूण क्षमता ६० लिटर आहे आणि बूट स्पेस ३२१ लिटर आहे. टाटा १७.४४ किमी/किलोग्राम मायलेजचा दावा करते. तसेच ही कार शहरात ११.६५ किमी/किलोग्राम मायलेज देते आणि महामार्गावर १७.५ किमी/किलोग्राम मायलेज देते.

