Headlines

TATA Group Stocks; अध्यक्षांचा राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5% गडगडले, गुंतवणूकदार भूईसपाट; काही मिनिटांतच बुडाले 46000 कोटी


TATA Stocks : 18 ऑगस्ट रोजी टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा नियोजित आहे, पण त्याआधी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी अचानक राजीनामा जाहीर केला आणि पुनर्नियुक्तीही नाकारली. ही बातमी उद्योग विश्वात पसरताच शेअर मार्केटमध्ये टाटा ग्रुपमधील या हालचालींचे परिणाम दिसून आले आणि बुधवारी टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव आला.

समूहाच्या शेअर्समधील घसरणीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यामुळे टाटा समूहाच्या दैनंदिन कामकाजात तात्काळ कोणताही मोठा व्यत्यय येण्याची शक्यता नसल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या दरम्यान, या हालचालींसोबतच बुधवारी व्यापक शेअर बाजारातही कमजोरी दिसून आली. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे गुंतवणूकदारांचा मूड बदलला, ज्यामुळे बाजारात विक्रीची लाट उसळली.

Maharashtra TimesGold Price Today: सोन्याचा पारा चढला! पिवळसर धातूचा भाव वधारलेलाच, चांदीच्या किमतीही आवाक्याबाहेर; ही तेजी टिकणार का?

एक राजीनामा अन् टाटा शेअर्सना घसरणीचे ग्रहण

दिवंगत रतन टाटांच्या जवळचे मानले जाणारे एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या बातमीचा समूहाच्या शेअर्सवर नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती न घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर टाटा समूहाच्या समभागांचे बाजारमूल्य 46000 कोटींनी कमी झाले. यामध्ये टीसीएस, टाटा मोटर्स, तेजस नेटवर्क्स आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला.

टाटा शेअर्सची सद्यस्थिती काय

टाटा सन्सच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचे वृत्त पसरताच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा शेअर 4% हून अधिक घसरला आणि 2440 रुपयांच्या आदल्या क्लोजिंगवरून 2322 रुपयांच्या दिवसातील नीचांकी पातळीवर घसारला. याशिवाय टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचा शेअर 3% पेक्षा जास्त घसरून 335 रुपयांवर खाली आला असताना टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचा शेअर जवळपास 3% घसरणीसह आदल्या दिवसाच्या 1088 रुपयांच्या क्लोजिंगवरून 1057 वर आला. तसेच टाटा कम्युनिकेशन्सचा शेअर 2% पेक्षा जास्त घसरला आणि 1710 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.

Maharashtra TimesPO Investment Scheme: फक्त व्याजातून 5 लाखांची कमाई; पोस्टाची टेन्शन फ्री रिटायरमेंट योजना! एकाच गुंतवणुकीत मिळेल जबरदस्त रिटर्नदुसरीकडे, या मोठ्या घडामोडींमध्येही टाटा केमिकल्सने सर्वाधिक म्हणजे 1.53% वाढ नोंदवली, तर टाटा मोटर्सने 0.99% आणि टाटा कॅपिटलमध्ये 0.27% वाढ झाली.

एन. चंद्रशेखरन काय म्हणाले

चंद्रशेखरन यांनी सांगितले की, टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून त्यांचा सध्याचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार असून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांनी एकमताने ठराव करून त्यांच्या पुढील कार्यकाळात पाच वर्षांची वाढ करण्याची शिफारस केलेली, असे त्यांनी निवेदनात म्हटले. टाटा सन्सच्या Nomination and Remuneration Committee ने तसेच संचालक मंडळानेही या शिफारशीची नोंद घेतली होती.

मात्र संचालक मंडळाच्या एका सदस्याने या पाठिंबा न दिल्याने प्रस्ताव पुढे पोहोचला नाही, असे चंद्रशेखरन यांनी सांगितले. त्यामुळे एकमत नसल्यामुळे आपण हा निर्णय पुढे ढकलणे पसंत केले, असे त्यांनी म्हणाले.

Maharashtra TimesPocket FM : मेट्रोमध्ये आली आयडिया, उभं केलं 7 हजार कोटींचं साम्राज्य! आधी आले अपयश, मग क्रिएटिव्हिटीने दिले नवे पंख“त्या संचालक मंडळाच्या बैठकीला आता सहा महिने उलटून गेले आहेत आणि आजवर यावर कोणताही निर्णय झालेला नाही,” असे चंद्रशेखरन म्हणाले. त्यामुळे, आपला सध्याचा कार्यकाळ संपल्यावर आपण पुन्हा नियुक्तीसाठी स्वतःचे नाव पुढे न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचवेळी, टाटा सन्सचे अनेक धोरणात्मक प्रकल्प अंमलबजावणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत आणि कर्मचारी, गुंतवणूकदार, भागीदार व इतर संबंधित घटकांना नेतृत्वाबाबत कॅलॅरिटी असली पाहिजे असेही चंद्रशेखरन पुढे म्हणाले.

तसेच बुधवारीच आपण आपला निर्णय टाटा सन्सच्या बोर्डला कळवला असून नेतृत्वाचे हस्तांतरण सुरळीतपणे पार पडण्यासाठी उत्तराधिकाराबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले.