Tanya Puri On Bollywood Actress : डिटेक्टिव्ह तान्या पुरीनं बॉलिवूडच्या एका क्युट इमेज असलेल्या अभिनेत्रीबद्दल धक्कादायक दावा केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सोशल मीडियावर ‘द ट्रेटर्स २’ बद्दल बरीच चर्चा सुरू आहे. या शोमध्ये २१ स्पर्धक असतील. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरी देखील या शोचा एक भाग आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये, तान्या पुरीनं एका अभिनेत्रीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
तान्या पुरीचा मोठा खुलासा
एका मुलाखतीदरम्यान तान्याला सेलिब्रटी केसबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तान्यानं एका अभिनेत्रीबद्दल दावा केला आहे. ती अभिनेत्री पूर्वीसारखी आता चित्रपटांमध्ये सक्रिय नाही. तान्यानं सांगितलं की, ही अभिनेत्री हॉटेल्समध्ये पुरुषांना भेटते आणि पैशांच्या बदल्यात त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवते. झहरा जानीसोबतच्या एका मुलाखतीत, तान्या पुरीनं दावा केला की, ही अभिनेत्री पूर्वी चित्रपटांमध्ये काम करत होती, पण आता ती पूर्वीइतके चित्रपट करत नाही. या अभिनेत्रीनं गेल्या काही वर्षांत बरीच संपत्ती आणि ओळख मिळवली आहे. ती अनेकदा सामाजिक कार्यक्रमांमध्ये दिसते. पडद्यामागे ती हॉटेल्समध्ये पुरुषांना भेटते आणि अशा पद्धतीनं पैसा कमावते, असं तान्यानं सांगितलं.
तान्या पुढे म्हणाली, ‘ती केवळ नवीन दुकानांचं उद्घाटन करणारी किंवा सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावणारी अभिनेत्री नाही. पडद्यामागे बरंच काही घडत असतं आणि तिची संपूर्ण टीम या गोष्टी सांभाळते. त्या अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडलाही याबद्दल सर्व काही माहित आहे. तो तिच्या टीमचा भाग आणि तिचा पार्टनर दोन्ही आहे. तो या सगळ्याला प्रोत्साहन देतो.’
तान्या पुरी लवकरच ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘द ट्रेटर्स २’ मध्ये दिसणार आहे. हा शो १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल. करण जोहर या शोचं सूत्रसंचालन करणार आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा