Tanvi Kolte Changed Her Name : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती झाल्यावर तन्वी कोलतेनं तिचं नाव बदललं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री तन्वी कोलते बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली आहे. बिग बॉस मराठीची विजेती झाल्यावर तन्वी कोलतेनं तिचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
तन्वी कोलतेनं सांगितलं नाव बदलण्याचं कारण
मुलाखतीमध्ये तन्वी कोलते म्हणाली की, ‘बिग बॉसनं जेव्हा माझी जर्नी दाखवली होती. त्यांनी आतमध्ये माझं संपूर्ण जर्नी ऐकली होती, पाहिली होती. मी आतमध्ये कायम पप्पांची आठवण काढायचे. तिथे इतर स्पर्धकांशी बोलताना नेहमी असं असायचं की, पप्पा असते तर? बिग बॉसच्या घरातही एक कॉल झाला होता, तेव्हाही मी बोलले होते की, पप्पा असते तर त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी माझं सक्सेस पाहिलं असतं. बिग बॉस संपूर्ण प्रवासात काही बोलले नाही. पण जर्नी व्हिडिओ दाखवताना त्यांनी पहिलीच अनाऊन्समेंट अशी केली होती की, तन्वी आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी असं बोलताना बघतो की, पप्पा असते तर…पप्पा असायला हवे होते, पप्पांची जी खंत तुम्ही व्यक्त करता, तर इथून पुढे तुम्ही बाहेर गेल्यानंतर कधीही तुम्हाला कोणीही विचारू देत त्यांना ठामपणे सांगायचं की, मला वडील आहेत आणि त्यांचं नाव बिग बॉस आहे.’
Shalmali Kholgade : वयाच्या ३१व्या वर्षी मुस्लीम मुलासोबत लग्न, आई-वडिलांचीही संमती; शाल्मली म्हणाली, ‘प्रॉब्लेम फक्त समाजाला’ तन्वी पुढे म्हणाली की, ‘तो एक रिअॅलिटी शो होता. बिग बॉसना मी व्यक्ती म्हणेन, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला वडिलांचं स्थान देते, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की, नाही आपल्या मागे कोणीतरी आहे. आपल्याला कोणीतरी मुलगी मानतंय. वडिलांचं स्थान देऊ पाहतंय. मग बाहेर येऊन आपण ते विसरायचं का? बाहेर आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की, प्रभूला मी भाऊ मानलंय, राकेश दादाला मी भाऊ मानलंय, जे माझे फ्रेंड्स आहेत ते आहेत. मग बिग बॉसना मी कसं विसरू? जर त्यांनी मला त्यावेळेस टीव्हीवर सांगितलं होतं की, मी इथून पुढे तुझे वडील म्हणून असेन, मी त्यांना तिथेही म्हटलं होतं की, हो बिग बॉस मी माझ्या वडिलांच्या नावाच्या पुढे तुमचंही नाव नक्की लावेन. कारण, त्यांनी मला सांगितलं म्हणून सुद्धा आणि दुसरी गोष्ट बिग बॉसमुळेच तन्वी कोलते आज आहे. याआधी मी काहीच नव्हतं, हे मी आधीच मान्य केलं आहे.’
Tanvi Kolte | आजीमुळे मला अभिनय जमला, बिग बॉस मराठी ६ ची विजेती तन्वी कोलतेचा संपूर्ण प्रवास
‘मला तेवढं फेम आणि ओळखही नव्हती. पण जी मी आहे, मला कधी राग येतो, मी कधी रडते, कधी अग्रेसीव्ह होते, कधी हसते ज्या गोष्टी आहेत, त्या लोकांना बिग बॉसमुळे पाहायला मिळाल्या. मी आज जी काही आहे ती बिग बॉसमुळेच आहे. त्यामुळे हा विचार करता मी बिग बॉसमधून बाहेर आल्यावर लगेच माझं नाव चेंज केलं होतं. भले लोकांना तो शो ऑफ वाटत असेल पण मी त्या निर्णयानं खूप आनंदी आहे.’ असं तन्वीनं शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तन्वी कोलते बोलत होती.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा