Tanushree Dutta On Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बॉलिवूडवर निशाणा साधला असून इंडस्ट्रीतील कटू अनुभव शेअर केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. अभिनेत्रीच्या पोस्ट कायम चर्चेत असतात. आता, तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी, अभिनेत्रीनं इंडस्ट्रीतील दिग्गजांवर निशाणा साधला आहे. ‘बॉलिवूडमध्ये, दिग्गज अभिनेते म्हणजे राक्षस आहेत’, असं तनुश्रीनं म्हटलंय. केवळ वयस्कर असल्यामुळे कोणाचा आदर का करावा, असा प्रश्न तिनं उपस्थित केला.
तनुश्री दत्ताची पोस्ट
बॉलिवूडवर निशाणा साधत तनुश्री दत्ता म्हणाली, ‘पनवती म्हणजे अपशकुन किंवा दुर्दैव आणणारी व्यक्ती. काही लोक जिथे जातात तिथे आपल्यासोबत अपशकुन किंवा दुर्दैव घेऊन येतात. वाईट लोकांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्या संगतीनं त्यांना पाठिंबा किंवा प्रोत्साहन देता कामा नये. राजकारण्यांनी त्यांच्या वैयक्तिक संगतीची जबाबदारी घेतली पाहिजे. महादेवानं मला याबद्दल एक स्वप्न दाखवलं! जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांशी किंवा गोष्टींशी संबंध ठेवता, तेव्हा चांगल्या गोष्टी घडू शकत नाहीत. हाच अपशकुन आणि दुर्दैव आहे जे वाईट संगतीमुळे होतं.’
तनुश्रीनं पुढे लिहिलं की, ‘मी त्यावेळी मोठी स्टार होते. कदाचित पहिल्या नंबरवर किंवा अगदीच सुपरस्टार नव्हते, पण एक स्टार अभिनेत्री नक्कीच होते. पण मी जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा लक्षात येतं की, काही परिस्थितीचा मला फटका बसला. जेव्हा मी नवीन होते तेव्हा ही इंडस्ट्री नेमकी कशी चालते, हे मी पूर्णपणे समजून घेतलं नव्हतं. त्यामुळे सेटवरच्या काही लोकांनी मला एकटं पाडलं. मला बळीचा बकरा बनवलं. त्यावेळी मी व्यवहारी नव्हते. त्यामुळे मला फटका बसला. पण, बॉलिवूडमध्ये कोणी वयानुसार सीनियर नसतं. ज्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालतो आणि हिट ठरतो, तोच खरा स्टार असतो.’
‘एखादा अभिनेता वयानं मोठा आहे किंवा ज्येष्ठ आहे म्हणून त्याला कोणी काम देत नसेल. त्यामुळे आपण त्याला मदत करावी, असं मलाही वाटायचं. पण नाही, बॉलिवूडमध्ये ‘दिग्गज कलाकार’ म्हणजे धूर्त बुद्धीचा, ज्यानं अनेक अनुभव घेतले आहेत आणि त्याला सगळ्या प्रकारची कटकारस्थानं माहिती आहेत. अशा व्यक्ती, ज्याला मीडिया आणि प्रेक्षकांना सहज मॅनिप्युलेट करता येतं, तो खरा ज्येष्ठ अभिनेता असतो.
Mohan Joshi : डोळ्यापुढे अंधारी, मेंदूत रक्ताची गाठ आढळली; मोहन जोशींना आलेला ब्रेन स्ट्रोक, पत्नीनं सांगितला प्रसंग ‘आत्मा आणि दैवत्व ओळखा. राक्षसही अनुभवी असतात. राक्षस प्राचीन प्राणी आहेत आणि माणसांपेक्षाही जुने आहेत. त्यामुळे ते अनुभवी दुष्ट आहेत. म्हणजेच ते बऱ्याच काळापासून दुष्टपणा करत आले आहेत. काही माणसं ही राक्षस आणि दानवांची रूपं असून त्यांना दिशाभूल करण्यासाठी पाठवलं गेलंय. मी एक मोठा धडा शिकले. आज मी वय पाहून नाही, तर चारित्र्यानुसार एखाद्या व्यक्तीला मान देते आणि त्याचा आदर करते.’ असं तनुश्रीनं शेवटी म्हटलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा