Swabhimani Shetkari Saghtana protest in Sindhudurg ; Raju Shetti : आंबा-काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींचा सरकारला इशारा; मागण्यांवर निर्णय न झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखणार
Swabhimani Shetkari Saghtana protest in Sindhudurg ; Raju Shetti : आंबा-काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींचा सरकारला इशारा; मागण्यांवर निर्णय न झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखणार
कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी १० दिवसांत निर्णय न झाल्यास २३ मार्चला मुंबई-गोवा महामार्ग रोखणार असं म्हटलं आहे.
आंबा कलमाला हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई मागणी- राजू शेट्टी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सिंधुदुर्ग: निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शासनाने येत्या १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास, २३ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून ‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग’ बेमुदत रोखून धरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या आणि भरपाईचा आकडा
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सोपवले आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबा कलमाला ५,००० रुपये प्रति किंवा हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी असं सांगण्यात आलं आहे. तर काजू पीकाला हेक्टरी ३ लाख रुपये मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. पीक विम्याची मुदत ३० मे पर्यंत वाढवण्यात यावी आणि कर्जमाफीबद्दल ज्या बागायतदारांचे नुकसान झाले आहे, त्यांचे चालू कर्जही (थकीत नसले तरी) पूर्णपणे माफ करावे. ही कर्जमाफी एनडीआरएफ निकषांच्या मदतीप्रमाणे २०१९ च्या महापुराप्रमाणे चौपट मदत मिळावी, अशा स्वरुपाची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती राजू शेट्टींनी दिली आहे.
सरकारला १० दिवसांचा अल्टिमेटम
सध्या राज्याचे विधीमंडळ अधिवेशन सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय सभागृहाबाहेर घेता येत नाहीत, असे पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवल्याची माहितीही त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी म्हणाले, “आम्ही संयमाची भूमिका घेत २३ मार्चपर्यंत सरकारची वाट पाहणार आहोत. मात्र, या काळात ठोस शासन निर्णय न आल्यास ही लढाई आरपारची असेल.”
आर्थिक नुकसानीसोबतच बाजारात निकृष्ट दर्जाची कीटकनाशके आणि औषधे विकली जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. कृषी विभागाने बोगस कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा सज्जड दमही आंदोलकांनी दिला आहे.
कोकणी शेतकरी हा मुळात संयमी आहे, पण आता त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे २३ मार्चचा इशारा हा सरकारसाठी शेवटची संधी आहे, असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा