Headlines

Supreme Court On Motor Accident Compensation ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय; कारमध्ये झालेला प्रत्येक मृत्यू ‘कार अपघात’ नाही, विमा क्लेम संबंधित काही अटी


भविष्यात आपल्या गाडीला होणाऱ्या नुकसानाचा आर्थिक दबाव कमी करण्यासाठी गाडीचे Insurance काढले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? गाडीच्या इन्शुरन्सचेही अनेक प्रकार असतात. अनेकवेळी वाहनमालकांना त्या प्रकारांबद्दल माहिती नसते, त्यामुळे वाहनामुळे काही नुकसान झाले किंवा वाहनाचे काही नुकसान झाले तर या इन्शुरन्समुळे होणाऱ्या फायद्यला ते मुकतात आणि स्वतःचे आणखीन नुकसान करून घेतात. भारतात वाहन मालकाला थर्ड पार्टी इन्शुरन्स काढणे अनिवार्य आहे. या इन्शुरन्समध्ये आपल्या वाहनामुळे दुसऱ्याच्या गाडीचे नुकसान झाले किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याच्या भरपाईचा आर्थिक दबाव आपल्यावर येत नाही. पण स्वतःच्या गाडीच्या झालेल्या नुकसानाला हे इन्शुरन्स कामी येत नाही, त्यासाठी Own DamageInsurance असावे लागते.

परंतु , सुप्रीम कोर्टाने नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय ‘कार अपघात’ आणि ‘विमा क्लेम’ संबंधित आहे. बऱ्याचदा बहुतेक गाडी मालकांना गैरसमज असतो की ‘वाहनात मृत्यू झाला तर Motor Accident Compensation Claim मिळतो.’ वाहन अपघातात मृत्यू झाला तर विमा क्लेम मिळतो हे खरं आहे पण त्यासाठी मृत्यू खरोखरच वाहनामुळेच झाला आहे का? हे सिद्ध करणेही तितकेच गरजेचे आहे. कारण त्याशिवाय विमा क्लेम करता येत नाही.

हल्लीच दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात वाहन आणि मृत्यू या विषयासंबंधित एक खटला सुरु होता. आनंद नावाच्या व्यक्ती संबंधित ही केस असून त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की तो मृत्यूच्या तीन दिवसांगोदर एका गाडीत बसून गेला होता. तीन दिवसांनंतर त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना मिळाली. गाडीत प्रवासादरम्यान हत्या झाली म्हणून त्याचे कुटुंबीय विमा क्लेमची मागणी करू लागले पण सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळूनलावली आहे.

Maharashtra TimesGold Silver Price August 2026: सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गोल्ड शॉक! ट्रम्प यांच्या घोषणेनंतर सोन्याचे दर भडकले, चांदीचेही भाव वाढले
काय म्हणालं सुप्रीम कोर्ट?

सुप्रीम कोर्टाने आनंद यांच्या कुटुंबीयांची मागणी फेटाळलीआहे. तसेच न्यायाधीशांकडून सांगण्यात आले आहे की, “जर मृत्यूचा संबंध थेट गाडीशी असेल तरच संबंधित व्यक्ती विमा क्लेमला पात्र ठरतो.” गाडी किंवा वाहनामध्ये झालेला प्रत्येक मृत्यू हा विमा क्लेमला पात्रच ठरेल असे नाही. कार लुटण्याच्या प्रकारामुळे झालेला मृत्यूही विमा क्लेमला पात्र ठरतो. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत की एक्सीडेंटल क्लेमसारखा मुद्द्यात पोलीस तपास करण्याची काहीच गरज नाही. क्लेमची मागणी करणाऱ्या कुटुंबियांना मृत्यू हा वाहनामुळेच झाला आहे किंवा संबंधिताच्या मृत्यूचा थेट संबंध गाडीशी आहे हे सिद्ध करणे भाग आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत