Headlines

Sunny Deol : ‘पैशांसाठी मी माझी तत्त्व विकणार नाही’, सनी देओलनं सांगितलं ‘पान मसाला’ची जाहिरात न करण्याचं कारण


Sunny Deol : सनी देओलनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पान मसालाच्या जाहिराती न करण्याचं कारण सांगितलं असून मी माझी तत्त्व विकणार नाही, असं अभिनेत्यानं सांगितलं आहे.

Sunny Deol On Vimal Elaichi Advertisement
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अक्षय कुमारनं ‘विमल इलायची’ची जाहिरात केल्यावर त्याला टीकेला सामोरं जावं लागलेलं. मात्र, माफी मागितल्यानंतर त्यानं पुन्हा अशी जाहिरात करणार नाही, असं सांगितलं. आता, मुंबईच्या अन्न सुरक्षा विभागानं शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावली आहे. यामुळे पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, सनी देओलनं पान मसाला जाहिरातींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सनी देओलनं स्पष्टपणे सांगितलं की, त्याला पान मसालाची जाहिरात करण्यात काहीही रस नाही. त्याला अशा ऑफर्स आल्या होत्या, पण त्यानं त्या नेहमीच नाकारल्या, कारण त्या उत्पादनाची जाहिरात करणं हे त्याच्या तत्वांच्या विरोधात आहे.

Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ

… म्हणून ‘पान मसाला’ची जाहिरात करत नाही

एका मुलाखतीदरम्यान सनी देओलला, तो पान मसाला ब्रँडच्या जाहिराती का नाकारतो? असं विचारलं असता अभिनेता म्हणाला की, ‘मी पान मसाल्याची जाहिरात करत नाही आणि कधीही करणार नाही. मला त्या जाहिरातींसाठी विचारणा होते, पण मी करणार नाही. ज्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, त्या मला करायच्या नाहीत.’ अभिनेत्याने पुढे सांगितलं की, तो पान मसालाला जाहिरात करण्यासारखं उत्पादन मानत नाही.

Maharashtra TimesSanjay Shejwal : 70-80 हजारांचं कर्ज, सचिन पिळगांवकरांमुळे मिळालं पहिलं काम; मराठी अभिनेत्यानं सांगितला संघर्षकाळ
सनी देओल म्हणाला, ‘या सर्व गोष्टींवर माझा विश्वास नाही. या जाहिरात करणं ही चांगली गोष्ट आहे, असं मला वाटतात नाही. पैशांसाठी मी माझी तत्व विकणार नाही. मी अनेक गोष्टी करत नाही. कारण माझी सद्सद्विवेकबुद्धी असा गोष्टी करू देत नाही, आणि ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या मी करतो. जसे मला पूर्वी चित्रपट मिळत नव्हते, तसंच जाहिरातींच्या बाबतीतही का होतं हे मला समजत नाही.’ शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सनी देओल बोलत होता.

Maharashtra TimesSohail Khan : ‘अलायन्स’ मध्ये जाताच सोहेल खान पडलेला आजारी, झालेला पोटाचा आजार; अभिनेत्यानं सांगितलं वजन कमी होण्याचं कारण
दरम्यान, सनी देओलच्या कामाबद्दल सांगायचं तर त्याचा ‘बटवारा १९४७’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता लवकरच ‘रामायण’ सिनेमातही दिसणार असून या सिनेमात त्यानं हनुमानाची भूमिका साकारली आहे.