Sunil Pal On Samay Raina : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समय रैनाचा सन्मान केल्यामुळे सुनील पाल संतापला असून त्यानं प्रतिक्रिया दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – स्टँडअप कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समय रैनाचा सन्मान केला. यानंतर कॉमेडियन सुनील पालनं महाराष्ट्र सरकारवर प्रश्न उपस्थित करत समय रैनावर निशाणा साधला आहे.
सुनील पालची समय रैनावर टीका
समय रैनाच्या सन्मानावर प्रतिक्रिया देताना सुनील पालनं नाराजी व्यक्त केली. त्यांनं सरकारनं समय रैनाला सन्मानित करण्याचा निर्णय का घेतला? असा सवाल केला. तसेच अशा प्रकारच्या सन्मानामुळे तरुण कॉमेडियन्समध्ये कोणता संदेश जाईल, याचाही विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं. सुनील पालनं समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोशी संबंधित वादाचा उल्लेख करत शोमधील आक्षेपार्ह भाषेवरही प्रश्न उपस्थित केले. ‘घोर कलियुग आ गया है,’ अशी प्रतिक्रिया देत त्यानं सरकारच्या निर्णयावर टीका केली.
महाराष्ट्र सायबरच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्म आणि नवीन हेल्पलाइन अँथमच्या लॉन्च कार्यक्रमात समय रैना सहभागी झाला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमातील व्हिडिओमध्ये फडणवीस आणि समय रैना यांच्यात संवाद झाला. आपल्या भाषणात समय रैनानं ‘इंडियाज गॉट लेटेंट’शी संबंधित जुन्या वादाचाही उल्लेख केला. त्यानंतर कार्यक्रमातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
समय रैनानं महाराष्ट्र सायबरसोबतच्या आपल्या सहभागावरही मजेशीर प्रतिक्रिया दिली. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादाच्या काळात महाराष्ट्र सायबरकडून अनेकदा संपर्क साधण्यात आल्यामुळे संबंधित नंबर आपण सेव्ह करून ठेवला होता, असं त्यानं विनोदी शैलीत सांगितलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा