Headlines

Sugar Price Hike Reason ; सरकारने इथेनॉलवर पुन्हा केली टाळाटाळ अन् दिली भलतीच कारणे, मग नक्की कशामुळे महागली साखर?


साखरेच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. 20 जुलै रोजी साखरेचा दर 48.18 रुपये प्रति किलो होता. एका महिन्यात साखरेच्या किंमतीत 7.52 रुपयांची वाढ दिसून आली. म्हणजेच एका महिन्यात 15.6% दराने साखरेच्या किंमती वाढल्या आहेत. दरम्यान, भारत देश जगातील मोठ्या साखर उत्पादकांपैकी एक आहे. अशात भारतातच साखरेसंदर्भात अशी परिस्थिति तयार झाल्यामुळे देशभरातून आक्रोश होत आहे आणि बहुतेकांनी इथेनॉलला वेठीस धरलं आहे. परंतु, भारत सरकारने इथेनॉलसंबंधित असणाऱ्या या आरोपांना फेटाळून लावले आहे.

सरकार म्हणत आहे की 2022-23 साठी इथेनॉलसाठी शुगर Diversion 12% होता. तोच 3% कमी करून 2025-26 मध्ये 9% वर आणण्यात आले आहे. एकंदरीत, इथेनॉल मध्ये साखरयुक्त पदार्थ आधीपेक्षा आता कमी वापरले जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तसेच इथेनॉल तयार करण्यासाठी वापरात येणारा 3/4 भाग हे धान्य मुख्यतः मका असतो, त्यामुळे साखरेच्या किंमतीच्या वाढीस इथेनॉल कारणीभूत असल्याचा दावा सरकारने फेटाळून लावला आहे.

इथेनॉल नाही मग सरकारच्या मते खरं कारण काय?

सरकार म्हणतं यंदा साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. विविध कारणांमुळे ऊसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याला अतिवृष्टी, रेड रॉट तसेच काही शेतात साचून राहिलेले पाणी कारणीभूत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अशात देशामध्ये सण उत्सवांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे मिठाई तसेच गोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पहिलेच देशात साखरेचे उत्पादन कमी आहे त्यात वाढत्या मागणीमुळे साखर निर्यातदार देशावर साखर इतर देशांतून आयात करण्याची वेळ आली आहे.

फक्त भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही साखरेच्या किंमती वाढल्या आहेत. 30 जून रोजी साखरेची आंतरराष्ट्रीय किंमत 474 डॉलर्स प्रति टन होती. तर हीच किंमत आता 552 डॉलर्स प्रति टनपर्यंत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेच्या किंमतीत 16% पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे.

परंतु, सरकारचे म्हणणे आहे की देशात अद्याप साखरेचा पूर्ण तुटवडा नाही. गाळप हंगामाला काही महीने उरले आहेत. ऑक्टोबरमध्ये ऊस गाळून साखर तयार करण्यात येते. सरकारच्या मते या हंगामापर्यंत देशांतर्गत गरज भागवेल इतका साखरेचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे.

Maharashtra Timesसोन्याच्या किंमतीत वाढ अन् Gold Loan कंपन्यांची चांदी; IIFL Finance च्या शेअरमध्ये आज इतकी तेजी का?देशात साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि विशेषकरून किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी 10 लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या आयातीवर Import Duty माफ करण्यात आली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत देशातील साखर वितरकांना 400 मेट्रिक टनपेक्षा जास्त साखरेचा साठा जमवून ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर बिस्किट कंपन्या, मिठाई कंपन्या तसेच साखरेचा वापर करून खाद्य उत्पादन करणाऱ्या इतर बल्क Consumers यांना 15 दिवसांच्या वापरापेक्षा जास्तीचा साखरसाठा ठेवता येणार नाही. कागदोपत्री नमूद करण्यात आलेला साखरसाठा आणि सरकारकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या साखरसाठेत फरक आढळला तर संबंधित कंपनीवर किंवा साखर वितरकावर सरकारकडून कारवाई करण्यात येईल.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत