6 महिन्यांनंतरही अमेरिका-इराण युद्ध थांबण्याचं चिन्हं दिसत नाहीय. त्यातच पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी ही (American territory) म्हणजेच अमेरिकेचा भूभाग असल्याचा दावा केला आहे. एवढंच नाहीतर, या संपूर्ण जलमार्गावर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याचाही ट्रम्प यांचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे ४ दिवसांपूर्वीच त्यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून होर्मुझ सामुद्रधुनीचा एक नकाशा देखील शेअर केला होता. ज्यात ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकन भूभाग म्हणून दाखवला आहे. त्यानंतर आता दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मूझ हा अमेरिकन टेरेटरी असल्याचा दावा केलाय. मात्र मात्र, इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. तर, दुसरीकडे म्हणालेत की, मादुरो यांना सत्तेतून हटवल्यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलामधून अब्जावधी डॉलर्स कमावलेत. त्यामुळं इराणवरही दबाव कायम ठेवल्यास त्याचा अमेरिकेला मोठा आर्थिक फायदा मिळण्याची त्यांना आशा आहे. त्यामुळं इराणसह त्यांचे व्हेनेझुएलासोबतही चांगलेच संबंध ताणलेत. तर, आणखी एक अमेरिकेचा वादाचा मुद्दा म्हणजे कॅनडानं अमेरिकेसोबतचा एक व्यापार करार नाकारला आहे. ज्यामुळं कॅनडाच्या २० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर तब्बल ५० टक्के शुल्क लागू करण्यात आलंय. तेव्हा ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराणनं कसं उत्तर दिलंय, कोणते पुन्हा निर्बंध कडक केलेत आणि व्हेनेझुएलासह, कॅनडाचे संबंध अमेरिकेशी कसे ताणलेत हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#MiddleEastConflict #USIranTension #MiddleEastTension #USIranRelations #IranDiplomacy #USDefensePolicy #Geopolitics #StraitOfHormuz #GlobalOilCrisis #Pezeshkian #Khamenei #WorldNews #MarathiExplainer #InternationalRelations #DonaldTrump #TrumpHormuz #AmericanTerritory #IranUSWar #USIranTensions #USIranConflict #HormuzCrisis #Venezuela #Maduro #TrumpVenezuela #CanadaUSRelations #CanadaTariffs #USCanadaTradeWar #TrumpTariffs #GlobalPolitics #WorldNews #InternationalNews #Geopolitics #AmericaNews #IranNews #VenezuelaNews #CanadaNewsThe US-Iran war shows no sign of ending even after six months. Donald Trump has once again claimed that the Strait of Hormuz is American territory and that the US has total control over the strategic waterway. Iran has rejected Trump’s claim. Meanwhile, Trump has also claimed that the US made billions from Venezuela after Maduro’s removal, while tensions with Canada have escalated after Ottawa rejected a trade deal, leading to 50% tariffs on $20 billion worth of Canadian goods. So, how has Iran responded to Trump, what new sanctions are being imposed, and why are US ties with Venezuela and Canada worsening? We’ll explain everything in this video.