Headlines

Spain Fire: कारमध्ये बसलेल्या पर्यटकांचा होरपळून शेवट; भीषण वणव्यात 12 जणांचा अंत, 23 जण बेपत्ता


Spain Fire: भीषण वणव्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ११ जण परदेशी पर्यटक आहेत. कारमध्ये बसलेले असताना त्यांना भीषण आगीनं गाठलं. तर २३ जण अद्यापही बेपत्ता आहेत.

spain fire
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
माद्रिद: स्पेनच्या दक्षिण भागात असलेल्या जंगलाला भीषण आग लागली आहे. या वणव्यात आतापर्यंत १२ जणांचा शेवट झाला असून २३ जणांचा शोध अद्यापही लागलेला नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनच्या इतिहासातील सर्वात धोकादायक आणि भीषण अग्नितांडव म्हणून या दुर्घटनेकडे पाहिलं जात आहे.

अंडालुसिया भागाचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख एंटानियो सान्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमधील १ जण स्पॅनिश नागरिक असून बाकी सगळे परदेशी नागरिक आहेत. प्रशासनानं लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला होता. पण काही जणांनी याकडे दुर्लक्ष करत कारमधून पळण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आग वेगानं पसरली आणि अनेक जण तिच्या भक्ष्यस्थानी पडले.
Maharashtra TimesChina Fire: बुटांच्या कारखान्याला भीषण आग; 28 जणांचा होरपळून अंत; अग्निशमन दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी
अल्मेरिया प्रांतातील लॉस गालार्डोस भागात असलेल्या जंगलांना आग लागली आहे. हा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियमसह अनेक देशांचे नागरिक या भागात राहतात.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमध्ये चार जणांचे शव सापडले. कारचं स्टेअरिंग उजव्या बाजूला असल्यानं ते ब्रिटिश नागरिक असल्याची शंका आहे. याशिवाय आणखी ८ जणांचे शव हाती लागले आहेत. आपल्या कार मागे सोडून पायी पळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होता. त्यांनी ज्या मार्गानं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तो रस्ता प्रशासनानं बाहेर निघण्यासाठी निश्चित केलेला नव्हता. अनेक शव गंभीररित्या होरपळलेले आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.
Maharashtra TimesPhu Quoc Island Accident : व्हिएतनाममध्ये 15 भारतीय पर्यटकांचा बुडून मृत्यू, फु क्वोक बेटाजवळ स्पीडबोट उलटून दुर्घटना
आग अतिशय वेगात पसरली आहे. आतापर्यंत पाहण्यात आलेल्या आगीच्या घटना पाहता आताची घटना सर्वाधिक गंभीर असल्याचं अंडालुसिया विभागाचे प्रमुख जुआन मॅन्युअल मोरेनो यांनी सांगितलं. ‘आतापर्यंत ३२०० हेक्टर परिसरावर आग पसरली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. बेपत्ता झालेल्यांमधील अनेक जण ट्रेकर्स आणि पर्यटक असण्याची दाट शक्यता आहे. ते जंगलात फिरायला आले होते. बचाव पथकांना घटनास्थळी अनेक वॉकिंग स्टिक सापडल्या आहेत. यामुळे पायी फिरणारे काही जण अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असण्याची दाट शक्यता आहे,’ असं मोरेनो म्हणाले.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा