Headlines

South Korea KOSPI Index Crash; 4 कोटींचा नफा, साडे चार कोटी नुकसान! कुणी फ्लॅट गमावला तर कुणी आयुष्यभराची कमाई, कोरियन मार्केटमध्ये 40 टक्क्यांची घसरण


Stock Market Update: शेअर बाजार कधी, कोणतं वळण घेईल याबाबत कोणीच खात्रीने सांगू शकत नाही. साल 2026 च्या पहिल्या सहामाहीत फिनिक्स झेप घेतलेल्या दक्षिण कोरियाई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या अख्ख्या आयुष्यात फक्त एका महिन्यात मोठी उलथापालथ झाली. महिन्याभरापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीतून मोठा नफा कमावला होता, तेच आता शोकाकुल झाले आहेत.

गेल्या महिन्याभरात दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात झालेली प्रचंड घसरणीच्या गुंतवणूकदारांच्या आनंदावर पाणी फेरले आहे. बाजाराचा मुख्य निर्देशांक कोस्पी, अवघ्या एका महिन्यात 34% कोसळला.

Maharashtra TimesPavel Durov: 100 हून अधिक मुलांचा बाप, 63000 कोटींच्या संपत्तीचा मालक ‘वॉन्टेड’; रशियाकडून दहशतवादाला मदत केल्याचा ठपका

दक्षिण कोरियाचा शेअर बाजार कोसळला

शेअर बाजाराचं विश्वास बाहेरून जितकं आकर्षक दिसतं, वास्तविकता तितकंच क्रूर असू शकते. अवघ्या एका महिन्यात दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना कटू वास्तव दाखवून दिले आहे. काही आठवड्यांपूर्वी प्रचंड नफ्याचा आनंद साजरा करणारे गुंतवणूकदार आता आपला उद्ध्वस्त झालेला पोर्टफोलिओ पाहून अश्रू ढाळत आहेत.

मागील एका वर्षात कोरियन स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजीचा कल दिसून आलेला आणि जगातील सर्वाधिक परतावा देणारे मार्केट बनलेले. तसेच अलीकडच्या घसरणीनंतरही कोरियन शेअर मार्केटमधील कोस्पी निर्देशांकाने एका वर्षाचा 71 टक्क्यांचा परतावा दिला. जगातील इतर कोणत्याही मार्केटमध्ये एका वर्षात इतकी तेजी क्वचितच दिसून आली असेल. या तेजीमध्ये एसके हायनिक्स आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या दोन चिप बनवणाऱ्या कंपन्यांनी मोठी भूमिका बजावली होती, पण आता, याच दोन कंपन्या कोरियन मार्केटच्या घसरणीत भर घालत आहेत.

Maharashtra Times8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना भरगच्च पगारवाढ, ‘हा’ फॉर्म्युला ठरला तर मिळेल 20 लाखांची बेसिक सॅलरी; पाहा कॅलक्युलेशन

आधी 400% उसळी, मग घसरणीचे ग्रहण

मागील एका वर्षभरात एसके हायनिक्स आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या दोन AI-सेंट्रिक कंपन्यांच्या स्टॉकमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या दरम्यान, एसके हायनिक्स शेअर 400 टक्के, तर सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स शेअरमध्ये याच काळात 185 टक्के वाढ झाली. मात्र, आता या दोन्ही कंपन्यांच्यास स्टॉकमधील तेजीला घसरणीचे ग्रहण लागले असून गेल्या महिन्यात एसके हायनिक्स शेअर्समध्ये 50% हून जास्त पडझड झाली तर, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स शेअर 38% घसरला.

अशा परिस्थितीत, कोरियन बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार होऊन आपल्या आयुष्यभराची बचत या दोन स्टॉक्समध्ये गुंतवली त्यांना, या घसरणीमुळे मोठा फटका सहन करावा लागला आहे. अनेक गुंतवणूकदारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली व्यथा व्यक्त केली आणि 29 जुलै रोजी, अशा गुंतवणूकदारांच्या असंख्य पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसून आल्या.

छोट्या गुंतवणूकदारांची बचत स्वाहा

थ्रेड्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका वापरकर्त्याने सांगितले की, सुरुवातीला शेअर गुंतवणुकीतून एकेकाळी जवळपास 4 कोटींचा नफा झालेला पण, तोच नफा 4.6 कोटींच्या तोट्यात बदलला आहे. त्याचवेळी, दुसऱ्या गुंतवणूकदाराने पोर्टफोलिओचे मूल्य 40% पर्यंत कमी झाल्याचे सांगितले. या गुंतवणूकदाराने आपल्या लग्नासाठी जमवलेली बचत शेअर बाजारात गुंतवलेली. इतकेच नव्हे तर फ्लॅट खरेदीसाठी बचत केलेले पैसे बाजारात गुंतवल्यावर एका वापरकर्त्याला अंदाजे 2 कोटींचे नुकसान झाले.