अकलूज -मेडिकल असोसिएशनचे मतदान सुरू असताना तू मतदारांशी बोलू नकोस असे म्हणून बाद उकरून काढत संगनमत करून लोखंडी पाईप व लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान धवल नगर, यशवंत नगर, अकलूज (ता. माळशिरस) येथील सौरभ हॉ लसमोरील बायपास रोडवर घडली.
या प्रकरणी ज्ञानेश्वर हनुमंत सपकाळ (वय २७, रा. धवल नगर, यशवंत नगर, अकलूज, ता. माळशिरस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीसठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेडिकल असोसिएशनच्या मतदानादरम्यान आरोपींनी फिर्यादी ज्ञानेश्वर सपकाळ यांना तू मतदारांशी बोलू नकोस असे म्हणून बाद घातला. त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आरोपी रणजित महाडिक (बय ३५, रा. अकलूज), योगेश गांधी (बय ३०, रा. अकलूज), आप्पासाहेबशेंबेडे (वय ४५, रा. नातेपुते) आणि अशपाक मुलानी (वय ३२, रा. वेळापूर, सर्व ता. माळशिरस) या चौघांनी संगनमत करून लोखंडी पाईपने व लाकडी काठीने मारहाण करून सपकाळ यांना जखमी केले. तसेच हे भांडण सोडवण्यासाठी आलेले सागर जगदाळे व समीर शेख यांनाही आरोपींनी मारहाण केली.
या गोंधळात फिर्यादीच्या गळ्यातीलसोन्याची साखळी (चेन) पडून गहाळ झाली आहे. याप्रकरणी अकलूज पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार विनोद प्रकाश चव्हाण तपास करत आहेत. अकलूज येथील सौरभ हॉलसमोर मेडिकल असोसिएशनच्या निवडणुकीत मतदारांशी बोलण्यावरून झालेल्या बादातून रणजित महाडिक, योगेश गांधी, आप्पासाहेब शेंबडे व अशपाक मुलानी या चौघांनी ज्ञानेश्वर सपकाळ यांना लोखंडी पाईप व काठीने मारहाण केली. भांडण सोडवणाऱ्या दोघांनाही मारहाण झाली असून या गोंधळात सोन्याची साखळी गहाळ झाली आहे. अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोहेकॉ विनोद चव्हाण तपास करत आहेत.
