Headlines

Solapur Crime | ‘माझ्या बायकोला फोन का केला?’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण; सोलापुरात खळबळ!


सोलापूर -तू माझ्या बायकोला का फोन केला असे म्हणून दोघांनी एका ३० वर्षीय तरुणाला मारहाण केली. ही मारहाण मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी येथे शुक्रवारी रात्री साडेआठच्या झाली. सुमारासअभिजित संजय चव्हाण (वय ३०) हा तरुणशुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याच्या राहत्या घराजवळ होता.

त्यावेळी शंकर खंडाळकर व गणेश खंडाळकर हे दोघे तेथे आले. त्या दोघांनी तू माझ्या बायकोला का फोन केला असे म्हणून त्यास लाकडाने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात सर्वांगास मुकामार लागल्याने मोहोळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार करून शनिवारी दुपारी १.३५ वाजता स्वतः उपचारास दाखल झाल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत