Software engineer in pune death after argument with boyfriend youth arrested; पुण्यात प्रेम प्रकरणाचा भयंकर शेवट; प्रियकर भेटीसाठी आला, दोन दिवस सोबत राहिला अन् इंजिनिअर तरुणीचं अचानक टोकाचं पाऊल
Software engineer in pune death after argument with boyfriend youth arrested; पुण्यात प्रेम प्रकरणाचा भयंकर शेवट; प्रियकर भेटीसाठी आला, दोन दिवस सोबत राहिला अन् इंजिनिअर तरुणीचं अचानक टोकाचं पाऊल
पुणे : आयटी क्षेत्राचे केंद्र मानल्या जाणाऱ्या पुण्यातील खराडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत झालेल्या वादातून आणि भांडणातून २३ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने राहत्या घरात गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, खराडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
जान्हवी पाठक (वय २३, मूळ रा. बिहार) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमृतकुमार अरुणकुमार सिंह (वय २३, रा. पहाडगंज, नवी दिल्ली) याला अटक केली आहे. तरुणीच्या उत्तर प्रदेशात राहणाऱ्या ४९ वर्षीय काकांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून खराडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी आणि अमृतकुमार हे दोघे एकमेकांना शालेय जीवनापासून ओळखत होते. त्यांचे शालेय शिक्षण एकत्रच पूर्ण झाले होते. त्यानंतर जान्हवीने राजस्थानमधून तिचे अभियांत्रिकीचे उच्चशिक्षण पूर्ण केले आणि करिअरच्या निमित्ताने ती पुण्यातील खराडी भागातील एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाली. गेल्या अवघ्या दोन महिन्यांपासून ती खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत वास्तव्यास होती. दुसरीकडे, आरोपी अमृतकुमार हा नोईडा येथील एका आयटी कंपनीत नोकरीला होता.
अमृतकुमार जान्हवीला भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच खास नोईडावरून पुण्यात आला होता. दोघेही रिव्हर डेल सोसायटीतील फ्लॅटमध्ये एकत्र होते. दरम्यान, गुरुवारी रात्री दोघांमध्ये अचानक कोणत्या तरी कारणावरून जोरदार खटका उडाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारी आणि शिवीगाळीत झाले. शुक्रवारी (२८ तारीख) दुपारी दीडच्या सुमारास अमृतकुमार काही कामासाठी इमारतीखाली गेला असता, त्याच दरम्यान जान्हवीने टोकाचा निर्णय घेत खोलीत पंख्याला गळफास लावून घेतला. अमृतकुमार परत आला तेव्हा ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा