Headlines

Smriti Irani : ‘तुकाराम ओंबळेंनी कसाबला पकडण्यासाठी एखाद्या तरुणाची वाट पाहिली नाही’, स्मृती इराणींचं वक्तव्य, केली जेन झींची बोलती बंद


Smriti Irani : स्मृती इराणी यांनी प्रेक्षकांसोबत साधलेल्या संवादात केलेलं वक्तव्य चर्चेत आलं असून त्यांनी वय आणि सामर्थ्य यातील फरक स्पष्ट केला आहे.

Smriti Irani On Gen Z
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सध्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी २’ मध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री-राजकारणी स्मृती इराणी यांनी नुकतंच वय, सामर्थ्य आणि महत्त्व यावर आपले विचार मांडले आहेत. प्रेक्षकांसोबत साधलेल्या संवादात स्मृती इराणी यांनी यावर भाष्य केलं असून २६/११चं उदाहरण दिलं आहे.

स्मृती इराणी यांनी विचारलं की, ‘तुमच्यापैकी किती जण २९ वर्षांचे आहेत?’ जेव्हा काही लोक उभे राहिले, तेव्हा त्यांनी त्यांना खोलीतील इतरांकडे पाहण्यास सांगितलं आणि म्हणाल्या, ‘जर आपण २९ वर्षांचे नाही आहोत, तर याचा अर्थ असा होतो का की आपण माणूस नाही? याचा अर्थ असा होतो का की, आपलं आता काही महत्त्व उरलं नाही?’

Maharashtra TimesPrajakta Mali : प्राजक्ता माळीचं चाहत्यांना खास सरप्राइज, नव्या लूकसह शेअर केली आनंदाची बातमी‘वय हे एखाद्या व्यक्तीचं मूल्य किंवा देशासाठी योगदान देण्याची क्षमता ठरवत नाही. स्मृती यांनी २६/११चं उदाहरण देत सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कामगिरीबद्दल सांगितलं. स्मृती म्हणाल्या की, कसाबला पकडण्यासाठी तुकाराम ओंबळे मागे हटले नाहीत किंवा परिस्थिती हाती घेण्यासाठी त्यांनी एखाद्या तरुण व्यक्तीची वाट पाहिली नाही.’ स्मृती पुढे म्हणाल्या की, संस्था अशाच प्रकारे काम करतात.

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

भारतीय लोकशाहीबद्दलही बोलताना स्मृती म्हणाल्या की, ६४ कोटींहून अधिक लोक मतदान करतात. लोक वेगवेगळ्या पक्षांना आणि नेत्यांना पाठिंबा देत असतील, पण त्यांच्यात एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे, भारताच्या संस्थांवरील त्यांचा विश्वास.

स्मृती इराणी यांचं टीव्ही करिअर

स्मृती इराणी यांच्या कामाबद्दल बोलायचं तर या अभिनेत्रीनं २०२५ मध्ये ‘तुलसी विरानी’ या आपल्या प्रतिष्ठित भूमिकेतून टेलिव्हिजनवर पुनरागमन केलं. त्या २५ वर्षांहून अधिक काळ या इंडस्ट्रीत आहेत. जुलै २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या सुपरहिट टेलिव्हिजन शोमधील ‘तुलसी विरानी’च्या भूमिकेमुळे स्मृती घराघरात पोहोचल्या.

Maharashtra TimesRajesh Kumar : सद्गुरूंचा सल्ला लोकप्रिय अभिनेत्यासाठी ठरला चुकीचा! कर्जबाजारी झाला, लेकाच्या शाळेबाहेर विकल्या भाज्या; काय घडलेलं?‘तुलसी’च्या भूमिकेसाठी आणि अमर उपाध्याय यांच्या ‘मिहिर’ या पात्रासोबतच्या त्यांची ऑन-स्क्रीन जोडी लोकप्रिय झाली. ही जोडी सर्वात लोकप्रिय टीव्ही जोडप्यांपैकी एक बनली. आठ वर्षांहून अधिक काळ टेलिव्हिजनवर ‘तुलसी’ची भूमिका साकारल्यानंतर, स्मृती इराणी त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या. ही अभिनेत्री सध्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’च्या दुसऱ्या पर्वात दिसत असून ही मालिका ऑगस्ट २०२५ पासून सुरू करण्यात आली.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा