Sheikh Hasina: याच वर्षी मी मायदेशी परतणार, असा निर्धार बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शेख हसीना मायदेशाबाहेर वास्तव्यास आहेत. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यांच्या अवामी लीग पक्षावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या सर्व परिस्थितीनंतरही मायदेशात परतण्याचा आपला निर्धार कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
France Heatwave 2026: फ्रान्समध्ये उष्णतेचा कहर! 1000हून अधिक नागरिकांनी गमावला जीव; विक्रमी उच्च तापमानाची नोंद
‘माझे मायदेशात परतणे हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा प्रश्न नसून, बांगलादेशातील लोकशाहीची पुनर्स्थापना, कायद्याचे राज्य आणि मुक्तियुद्धाच्या मूल्यांचे संरक्षण यांच्याशी निगडित आहे,’ असे त्या म्हणाल्या. आपल्याविरोधातील न्यायालयीन प्रक्रिया ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी केला. अवामी लीग ही केवळ राजकीय संघटना नसून बंगाली राष्ट्राची अस्मिता, इतिहास आणि जनतेशी जोडलेली एक शक्ती असल्याचा दावा त्यांनी केला. ‘पक्षावरील बंदी, कार्यकर्त्यांवरील कारवाई आणि दडपशाही असूनही देशभरात अवामी लीगच्या समर्थनार्थ मिरवणुका निघत आहेत. पक्षाच्या पुनरुत्थानाची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येते,’ असे त्या म्हणाल्या. अवामी लीगचे पुनरागमन जनतेच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचे त्या म्हणाल्या.
PM Modi: PM मोदींनी घेतली 194 वर्षांच्या ‘जोनाथन’ची भेट; सेशेल्स दौरा चर्चेत
बांगलादेश मुक्तियुद्धाच्या मूल्यावर आधात आला असून, अल्पसंख्याकांवर हल्ले, धार्मिक स्थळांची तोडफोड आणि अतिरेकी विचारसरणीला खतपाणी घालण्याचे प्रकार वाढले आहेत. मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका झाल्यास अवामी लीग निश्चितपणे विजयी होईल . – शेख हसीना

