Headlines

Shehzad Poonawala: राहुल गांधी श्रावणात फिश पार्टी करतात, आम्ही एका ‘पवित्र’ महिन्यात ‘पोर्क पार्टी’ केलेली चालेल का? शहजाद पूनावाला भडकले


शहजाद पूनावाला यांनी नुकताच भारतीय जनता पक्षातून राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरी त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टोला लागावणे सोडलं नाही आहे. उत्तर प्रदेश येथील अयोध्यामध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या मेजवानीत मासे वाढण्यात आल्याने पूर्व भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला हे राहुल गांधीवर भडकले आहेत. त्यांनी इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करत राहुल गांधीवर आणि काँग्रेस पक्षावर टोला लगावला आहे.

इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये काय म्हणाले शहजाद पूनावाला?

शहजाद पूनावाला यांनी व्हिडीओ शेअर करत म्हणाले की,” हिंदूच्या श्रद्धेची काँग्रेसने थट्टा उडवून ठेवली आहे. सनातनचा अपमान-अवमान करणे काँग्रेसचा DNA झाला आहे, त्यामागचं कारण म्हणजे व्होट बँकेच्या राजकारणासाठी, याचे अनेक उधाहरण देखील आहे. एवढेच नाही तर, सगळी मर्यादा काँग्रेसने ओलांडली आहे. पुढे ते बोलले, अयोध्या सर्वात पवित्र ठिकाणाहून एक आहे, याच पवित्र ठिकाणी काँग्रेस पक्षाने सार्वजनिक रित्या मासे दाखवले आणि एवढेच नाही तर ते वाढले देखील, तेही श्रावणाच्या महिन्यात. श्रावणात लोक सात्त्विक आहार ग्रहण करतात आणि तिथे मासे सार्वजनिक रित्या दाखवण्यात आले आणि वाढण्यात देखील आले. “

शहजाद पुनावाला पुढे म्हणाले, “कोण काय खातंय, घरी खात आहे याच्याशी मुळात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे आपापल्या आवडी निवडीचा भाग आहे, मात्र प्रश्न असा आहे की जर खाणं-पिणं जर आपापल्या आवडी निवडीचा भाग आहे तर बंगालमध्ये भाजप सरकारने लोकांना मासे खाऊ दिले जाणार नाहीत यावर का राजकीय मुद्दा बनवला?

‘पवित्र’ महिन्यात ‘पोर्क पार्टी’ केलेली चालेल का?

पूनावाला पुढे म्हणाले, २०२३ मध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत चंपारण येथे मटण शिजवले याचा संदर्भ देत काँग्रेसने नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. जर हे मासे प्रदर्शन चुकीचे नसेल तर तुम्ही दुसऱ्या धर्माच्या पवित्र महिन्यात सार्वजनिक रित्या पोर्क पार्टीमध्ये उपस्थित राहणार का?

पुढे ते बोलले सनातन आणि हिंदू धर्माची थट्टा करणे आणि अवमान करणे हेच काँग्रेसची राजकीय रणनीती बनली आहे. हा इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील टाकला आहे. तिथे देखील त्यांनी राहुल गांधीला प्रश्न विचारत श्रावण महिन्यात अयोध्येत काँग्रेसने फिश पार्टी केली… तर दुसऱ्या धर्माच्या पवित्र महिन्यात पोर्क पार्टीला तुम्ही उपस्थित असणार? “घाबरू नको… उत्तर दे” असं देखील त्यांनी X वर पोस्ट करत लिहिले.

इन्स्टाग्राम नाही तर राहुल ग्राम लिहत आणखी एक पोस्ट शेअर

शहजाद पूनावाला यांनी X वर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एका मेलचा स्क्रीनशॉट टाकलं आहे. एवढेच नाही तर त्यांनी हा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की हे इन्स्टाग्राम नसून राहुल ग्राम आहे. मेलमध्ये लिहलं आहे की, प्रिय शहजाद, मी तुमचा करण वर्माच्या चॅनेलवर रंगरेज सोबतचा एक पॉडकास्ट बघितला होता. त्यानंतर मी तुम्हाला इन्स्टाग्राम फॉलो करायला सुरुवात केली. मात्र गेल्या एक दोन आठवड्यापासून तांत्रिक त्रुटी मला दिसून येत आहे. मी आज रात्री तुम्हाला फॉलो केलं तर दुसऱ्याच दिवशी सकाळी आपोआप अनफॉलो होत आहे. एवढेच नाही तर हीच बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोफाईल सोबत पण घडत आहे. पूनावाला तुम्ही हे केलात की काहीतरी तांत्रिक त्रुटी आहे, याचा उत्तर देण्याची विनंती मेल करणाऱ्या व्यक्तीने केली आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत