सरकारी पोर्टलवर शिक्षकांची बनावट ओळख म्हणजे आयडी तयार करून त्यांच्या नावे वेतन लाटल्याच्या कथित ‘शालार्थ आयडी’ घोटाळाप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर मधील शेंदुर्णी येथील शिक्षण संस्थेचे प्रमुख आणि भाजप नेते संजय गरुड याला पोलिसांनी अटक केली. नाशिक न्यायालयाने त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याने एका दिवसात तब्बल १७७ बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘शालार्थ आयडी’ घोटाळा म्हणजे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक, बनावट शाळा, अस्तित्वात नसलेले शिक्षक आणि कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटण्याचे धक्कादायक कारस्थान! नाशिक, नागपूर आणि जळगाव परिसरापासून संपूर्ण राज्यात पसरलेल्या या भ्रष्टाचाराचे धागेदोरे नक्की कुठे जोडलेले आहेत? संजय गरुड कोण आहे? हा घोटाळा कसा उघडकीस आला आणि पुढे कोणावर कारवाई होणार? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया..