► वृत्तसंस्था
दोहा
कतारचे माजी अमीर, शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे रविवारी सकाळी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. कतारची सर्वोच्च सरकारी संस्था, अमीरी दिवाणने, ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या निधनासंबंधीची घोषणा केली. शेख हमद यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतल्याचे निवेदनाद्वारी जाहीर करण्यात आले.
तथापि, त्यांच्या मृत्यूचे कारण उघड करण्यात आले नाही. शेख हमद बिन खलिफा अल थानी हे 1995 ते 2013 पर्यंत कतारचे अमीर होते. त्यांच्या कार्यकाळात कतारने जलद आर्थिक आणि राजनैतिक विकास अनुभवला. 2013 मध्ये त्यांनी कतारची सत्ता आपले पुत्र, शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याकडे सोपवली असून तेच सध्या कतारचे विद्यमान अमीर आहेत.
