Headlines

Service Charges In Restaurants And Hotels; 41 रेस्टॉरंट्सवर 50 हजारांचा दंड, CCPA चा मोठा निर्णय; तुमच्याकडूनही सेवा शुल्क आकारला जातोय? कुठे कराल तक्रार?


Hotel Service Charges Rules: चायोस, बार्बेक्यू नेशन, ल’ओपेरा फ्रेंच बेकरी प्रायव्हेट लिमिटेड आणि देशभरातील इतर 41 रेस्टॉरंट्सवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण किंवा CCPA ने स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाईचा बडगा उचलला. या रेस्टॉरंट्सवर ग्राहकांच्या बिलांमध्ये सेवा शुल्क जोडून आणि पैसे थकवून ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांनी अनुचित व्यापारी पद्धतींचा अवलंब केला आहे.

हॉटेल-रेस्टोरंट बिलांमध्ये सेवा शुल्क

बेकायदेशीर असले तरी आजही रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बिलामध्ये गुपचूप सेवा शुल्क ॲड करतात, ज्याची बऱ्याच लोकांना कल्पना नसते. माहीत असूनही रेस्टॉरंट मालकांनी बिलातून सेवा शुल्क काढून टाकण्यास सांगितले, तर तसे करण्यास नकार देतात. वेटरला मिळणारी टीप किंवा स्वतःच्या धोरणांचे कारण देऊन ही बेकायदेशीर वसुली करतात. याआधी केंद्र सरकारने रेस्टॉरंटना कोणाकडूनही सेवा शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले पण, तरीही ग्राहकांच्या रोजच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर CCPA ने सेवा शुल्क आकारण्यावरून 41 रेस्टॉरंटवर दंड आकारला आहे.

Maharashtra TimesGold Silver Price Today: आठवड्याभराच्या घसरणीनंतर सोने-चांदीचा दर वाढला, काय आहे आजचा रेट? युद्धाच्या सावटात खरेदीचा पॅटर्नच बदलला
लक्षात घ्या की तुम्ही एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तुमच्याकडून जबरदस्तीने सेवा शुल्क आकारले गेले तर, तुम्ही सहन करू नका. अशा मनमानी रेस्टॉरंट मालकांनी तुमच्याकडून आकारलेला पै पै परत केला पाहिजे, जे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने प्रणाली स्थापित केली आहे. मात्र, सर्वसामान्यांमधील माहितीच्या अभावामुळे बहुतेक ग्राहक रेस्टॉरंट आणि हॉटेल्सच्या या मनमानी पद्धतीची तक्रार करत नाहीत.

सेवा शुल्काचा नियम काय

सर्वप्रथम लक्षात घ्या की कोणताही ग्राहक आपल्या मर्जीने सेवा शुल्क देऊ शकतो, पण बंधनकारक नाही. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यानुसार कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटने बिलामध्ये मनमानी सेवा शुल्क जोडणे बेकायदेशीर असते. जेवण किंवा सेवा चांगली असेल तर, ग्राहक आनंदाने सेवा शुल्क भरू शकतो, त्यांच्यावर बंधनकारकपणे लादले जाऊ शकत नाही.

Maharashtra TimesCrude Oil Price Hike Shock: धोक्याची घंटा! तेलाच्या किमती पेटल्या; पेट्रोलपासून किराणा वस्तूपर्यंत सगळं महागणार? जगाची तेलकोंडी होण्याची चिंता वाढली
रेस्टॉरंट सेवा शुल्क आकारत असल्यास कुठे तक्रार करायची?

ग्राहकांना माहिती असले पाहिजे की एखाद्या रेस्टॉरंटने जेवणाच्या बिलामध्ये सेवा शुल्क जोडले आणि तुम्ही विनंती करूनही सेवा शुल्क हटण्यास नकार देत असेल, तुम्ही सरकारकडे तक्रार करू शकता. हॉटेल-रेस्टॉरंटने सेवा शुल्क आकारण्याविरुद्ध तक्रार करण्याचे अनेक मार्ग आहेत.

Maharashtra TimesProperty Rights: पतीने आईच्या नावावर केलेली मालमत्ता खरंच घटस्फोटित पत्नीला मिळत नाही? परिस्थितीत हिस्सा मिळू शकतो समजून घ्या
1915 वर कॉल करा : एखाद्या रेस्टॉरंटने सेवा शुल्क माफ करण्यास नकार दिला तर, तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक 1915 वर कॉल करू शकता.

NCH ॲप: तुमच्या मोबाईलवर NCH ॲप (राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन) डाउनलोड करून रेस्टॉरंटविरुद्ध तक्रार दाखल करू शकता. येथे दाखल केलेल्या तक्रारींवर त्वरित प्रक्रिया केली जाते.

ई-दाखिल पोर्टल: ई-दाखिल पोर्टलवर – edaakhil.nic.in – देखील तक्रार करू शकता, ज्यामुळे वकिलाच्या सहभागाशिवाय घरबसल्या ग्राहक आयोगाकडे ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.

CCPA ई-मेल करा: तुमचे बिल आणि तक्रार CCPA ला com-ccpa@nic.in या ई-मेल ॲड्रेसवर पाठवू शकता. रेस्टॉरंट किंवा हॉटेलद्वारे होणाऱ्या या बेकायदेशीर वसुलीबद्दल तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करू शकता.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत