Senior Citizen Saving Scheme Advantage and Disadvantage; रिटायरमेंटसाठी SCSS योजना कितपत योग्य? FD पेक्षा जास्त रिटर्न्स, दरमहा हजारो रुपये मिळतील, पण वेळीच समजून घ्या धोके
Senior Citizen Saving Scheme Advantage and Disadvantage; रिटायरमेंटसाठी SCSS योजना कितपत योग्य? FD पेक्षा जास्त रिटर्न्स, दरमहा हजारो रुपये मिळतील, पण वेळीच समजून घ्या धोके
Senior Citizen Saving Scheme: ज्येष्ठ नागरिक जर रिटायरमेंटनंतर गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या योजनेच्या शोधात असतील तर, SCSS मध्ये गुंतवणूक करून निश्चित मासिक उत्पन्न मिळवू शकतात, पण निवृत्तीसाठी केवळ SCSS मध्येच गुंतवणूक करणे योग्य आहे का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
FD पेक्षा जास्त रिटर्न्स, दरमहा हजारो रुपये मिळतील, पण वेळीच समजून घ्या धोके(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Retirement Schemes: नोकरीनंतर रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना किंवा SCSS ही योजना ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. SCSS मध्ये गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिक रिटायरमेंटनंतर एक निश्चित दरमहा उत्पन्न मिळवू शकतात. पण निवृत्तीसाठी केवळ SCSS मध्येच गुंतवणूक करणे योग्य आहे का?
SCSS मध्ये गुंतवणुकीचे तपशील
60 वर्षांपेक्षा जास्त वयातील व्यक्ती SCSS मध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपयेपासून गुंतवणूक सुरू करण्याची संधी असून कमाल 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक शक्य आहे. या सरकारी योजनेत वार्षिक 8.2% दराने तिमाही आधारावर व्याज दिले जाते. सुरुवातीला या योजनेचा कालावधी पाच वर्षांसाठी तर, मॅच्युरिटीनंतर नियमांनुसार आणखी तीन वर्षांसाठी कालावधी वाढवला जाऊ शकतो.
SCSS मध्ये हमी उत्पन्न मिळत असले तरीही खर्च नेहमीच सारखा नसतो. कालांतराने अन्न, वैद्यकीय सेवा आणि इतर जीवनावश्यक वस्तू अधिक महागतात त्यामुळे, आजचं उत्पन्न भविष्यात कमी पडू शकतं. SCSS उत्पन्न संपूर्ण कालावधीत स्थिर राहते आणि त्यामुळे महागाईसोबत वाढत नाही, म्हणून केवळ SCSS मध्ये गुंतवणूक योग्य नाही. गुंतवणूकदारांनी SCSS व्यतिरिक्त इतरत्रही गुंतवणूक करावी.
इतकेच नाही तर, SCSS द्वारे मिळणारे व्याज करपात्र आहे. एकूण उत्पन्न आणि टॅक्स स्लॅबवर आधारित गुंतवणूकदाराला कर आकारला जाऊ शकतो. त्यामुळे, केवळ 8.2% व्याज दरावर आधारित गणना करू नका. कर वजावटीनंतर तुम्हाला प्रत्यक्षात किती रक्कम मिळेल हेही समजून घ्या आणि माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घ्या.
निवृत्तीनंतर अचानक अनपेक्षित वैद्यकीय खर्च किंवा मोठी घरगुती गरज उद्भवू शकते, म्हणून अशा परिस्थितीत त्वरित निधी मिळणे आवश्यक आहे. पण SCSS मध्ये मॅच्युरिटीआधी पैसे काढण्यावर काही अटी लागू होतात. मुदतपूर्व निधी काढण्याच्या नियमांनुसार दंड किंवा इतर कपात होऊ शकते त्यामुळे, आपत्कालीन परिस्थितीसाठी निधी बाजूला ठेवणं शहाणपणाचं आहे जेणेकरून गरज पडल्यास त्वरित आर्थिक मदत मिळू शकेल.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा