Savita Malpekar On Deool Band 2 : सविता मालपेकर यांनी एका मुलाखतीमध्ये ‘देऊळ बंद २’ सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सविता मालपेकर यांनी प्रवीण तरडे यांच्या ‘ देऊळ बंद २ ‘ सिनेमामध्ये काम केलं आहे. या सिनेमामध्ये मोहन जोशींनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. सिनेमात सविता मालपेकर रागाच्या भरात स्वामींना मारतात, असा सीन आहे. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सविता मालपेकर यांनी या सीनच्या शूटिंगदरम्यानचा प्रसंग सांगितला आहे.
सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग
मुलाखतीदरम्यान सविता मालपेकर म्हणाल्या की, ‘तो सीन करताना माझे पती आयसीयूमध्ये सिरीयस होते. याबद्दल मोहन जोशींना आणि प्रवीणला काहीच माहित नव्हतं. पण, आधी जेव्हा कथा वाचून दाखवली जाते, त्यावेळी मला प्रवीणने त्या सीनबद्दल सांगितलेलं. पण, सीन शूट करताना मी स्वामींची माफी मागितलेली. त्यांना मी म्हटलं, हे माझं काम आहे आणि तुम्हीच सांगितलंय काम सगळ्यात श्रेष्ठ असतं. त्यामुळे मी तो सीन करणार आहे. त्यानंतर मी तो सीन केला.’
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
‘आपल्या आयुष्यात काही वाईट घडलं तर आपण देवसोबत भांडतो. सिनेमामध्ये तर दिवसरात्र स्वामी-स्वामी करणारा तिचा मुलगा जीव देतो त्या स्त्रीची तडफड सीनमध्ये दाखवण्यात आली आहे.’ असं सविता यांनी पुढे सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविता मालपेकर बोलत होत्या.
Manisha Koirala : ‘एकटेपणा जाणवायचा, आता मी मरणार आहे असं वाटायचं’, मनीषा कोईरालानं सांगितला कॅन्सरचा कठीण काळ याच मुलाखतीदरम्यान सविता यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला होता. सविता म्हणाल्या की, ‘मी काम सुरू करण्यापूर्वी प्रवीणबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. तो सेटवर खूप शिव्या देतो, तोंडावर स्पष्ट बोलतो, असं लोक म्हणायचे. मला हे सगळं मान्यही आहे. पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की, तो एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याच्या डोक्यात सतत नवनवीन कल्पना असतात. त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट केले आहेत आणि स्वतःसाठी मोठी स्वप्नं पाहिली आहेत. दिग्दर्शक म्हणून प्रवीणच्या डोक्यात एकच गोष्ट असते की, निर्मात्याने चित्रपटावर आपले पैसे लावले आहेत. त्यामुळे काम चोख झालं पाहिजे. त्यामुळे तो कधी कधी रागावतो. पण, त्याचा तो राग फक्त कामापुरता मर्यादित असतो. सीन संपताच तो तितक्याच प्रेमानं जवळ घेतो, कौतुकही करतो.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा