Headlines

Saudi Arabia Oil Price Cut; तेलाच्या खेळात सौदी अरेबियाची बाजी! भारताच्या मित्राने वाढत्या किमतीतवर केला 26 वर्षांतील सर्वात मोठा ‘स्ट्राईक’


Crude Oil Price Cut: सौदी अरेबियातील सरकारी मालकीची कंपनी – सौदी आरामको – ने आशियाई देशांना सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या आपल्या ‘अरेब लाईट’ कच्च्या तेलाच्या किमतीत किमान 26 वर्षांतील सर्वात मोठी कपात जाहीर केली आहे. ही केवळ विक्रमी दर कपात नाही तर, जागतिक तेल बाजारातील बदलती समीकरणे, वाढता पुरवठा आणि ग्राहकांना टिकवून ठेवण्याच्या धोरणाचे प्रतिबिंब आहे.

Saudi Arabia Cuts Crude Oil Prices Biggest in 26 Years for Asian Buyers
सौदी अरामकोने आशियाई बाजारासाठी तेलाचे दर कमी केले(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Global Oil Prices: तुम्ही पेट्रोल आणि डिझेल, महागाई किंवा शेअर बाजारावर लक्ष ठेवून असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदारांपैकी सौदी अरेबियाच्या अलीकडच्या एका निर्णयाने जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली आहे.

सौदीचा तेल बाजार हादरवणारा निर्णय

सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी, सौदी अरामकोने, वाढता जागतिक पुरवठा आणि खरेदीदारांमधील वाढत्या स्पर्धांचा हवाला देत आशियाई ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या ‘अरेब लाईट’ क्रूडच्या किमतीत किमान 26 वर्षांतील सर्वात मोठी कपात जाहीर केली असून सौदीच्या या हालचालींचा परिणाम भारतावरही थेट होईल. यानुसार आता सौदी आरामको आता आशियाई देशांना आपले अरब लाईट तेल प्रति बॅरल 11 डॉलरच्या सवलतीने विकेल.

Maharashtra TimesStock Crash: कधी रॉकेटपेक्षाही सुस्साट, आता कोणी ढुंकूनही पाहीना; अंबानींच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांचा खिशाला चाट
सरकारी तेल उत्पादक सौदी अरामको पुढील महिन्यात आशियासाठीच्या आपल्या ‘अरेब लाईट’ तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 11 डॉलरची कपात करणार असून याआधी ब्लूमबर्गच्या अहवालात 8 डॉलरच्या घसरणीपर्यंत कपातीची शक्यता वर्तवली गेलेली. याआधी काही दिवसांपूर्वी 22 देशांच्या ओपेक+ समूहाने पुढील महिन्यापासून तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याचे जाहीर केले. यामुळे भारतासह जगालाही दिलासा मिळाला तर, अलीकडच्या सौदी आरामकोच्या निर्णयाने दिलास्यात आणखी भर पाडली.

अमेरिका आणि इराण यांच्यात ‘60 दिवसांचा करार’ झाल्यानंतर आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा सुरळीत झाल्यावर जूनच्या मध्यापासून जागतिक बाजारात क्रूडच्या किमतीत घसरण होऊ लागली. यामुळे ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 72 डॉलरपर्यंत घसरली आहे, जी फेब्रुवारीच्या अखेरीसच्या पातळीइतकीच आहे.

Maharashtra TimesSK Hynix Listing: AI क्षेत्रात मोठा बूम! कधीही न मिळणारी ‘जॅकपॉट’ संधी, अनोळखी कोरियन चिपमेकर कंपनी करणार 2800 कोटींचा श्रीगणेशा

इतकी मोठी कपात करण्याचे कारण काय

मध्यपूर्वेत शांतता झाल्यावर जगभर पुन्हा वेगाने तेलाचा पुरवठा सुरू झाल्यामुळे सौदीने मोठं पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. अलीकडच्या काळात बाजारात क्रूडची उपलब्धता वाढली, म्हणजे जेव्हा पुरवठा जास्त असतो आणि खरेदीदार मर्यादित असतात, तेव्हा ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या स्पर्धा करतात.

सद्य आशियाई बाजारात अशीच परिस्थितीत दिसत आहे. आशियाई तेल रिफायनरीज कंपन्यांनी त्यांच्याकडून अधिक तेल खरेदी करण्याच्या उद्देशाने सौदी अरेबियाने आपल्या क्रूडच्या किमतीत लक्षणीयरीत्या कपात केली आहे.

Maharashtra TimesMaya Tata: माया टाटा आहेत तरी कोण? नोएल टाटांची मुलगी महासाम्राज्यात मोठी जबाबदारी पेलणार, TATA ग्रुपमध्ये त्यांची चर्चा का?

सौदीच्या निर्णयाचा भारताला किती फायदा

भारत आपल्या गरजेपैकी 85 टक्के तेल परदेशातून आयात करतो. अशा परिस्थितीत, या संदर्भात, सौदी अरेबियाने आशियाई देशांसाठी तेलाच्या किमतीत केलेल्या ऐतिहासिक कपातीमुळे भारताचे आयात बिल आणि चालू खात्यातील तूट लक्षणीयरीत्या कमी होऊ शकेल, ज्याचा अर्थव्यवस्था आणि रुपयावर थेट परिणाम होईल.

याशिवाय, क्रूडच्या किमतीतील कपातीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत किरकोळ किमतीत कपात होण्याची शक्यताही वाढेल. यामुळे देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यास आणि तेल विपणन कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण सुधारण्यास थेट मदत होईल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा