Headlines

Satara DCC Bank Election Shambhuraj Desai meets Sharad Pawar at Silver Oak; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे मोसमी वारे ‘सिल्व्हर ओक’वर; शंभूराज देसाई शरद पवार यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या


Shambhraj Desai meets Sharad Pawar : सातारा जिल्हा बँकेचे पहिले अध्यक्ष, लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पहिल्यांदाच ‘सिल्व्हर ओक’वर पाऊल ठेवलं.

Shambhuraj Desai Sharad Pawar Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे आता मुंबईत पोहोचले आहेत. बँकेचे पहिले अध्यक्ष लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पहिल्यांदाच ‘ सिल्व्हर ओक ‘वर पाऊल ठेवलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

पाटणकरांचे पुत्र भाजपात, देसाई ‘सिल्व्हर ओक’वर

लोकनेत्यांच्या नंतर दीर्घ काळाने शंभूराज देसाईंना जिल्हा बँकेत एन्ट्री करण्याची संधी आली आहे. पाटण तालुका सोसायटी मतदारसंघातून त्यांनी जोरदार तयारी केली आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर हे राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपवासी झाल्यानंतर शंभूराज देसाईंनी ‘सिल्व्हर ओक’वर जाणे, ही राजकीय वर्तुळात मोठी घडामोड मानली जात आहे.

सदिच्छा भेटीचं कारण, वेगळंच राजकारण

महायुतीच्या सरकारमध्ये पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंनी गुरुवारी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, असं म्हटलं जात असलं तरी सातारा जिल्ह्यात सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असल्याने ही भेट मोसमी होती, हे उघडच आहे. या भेटीत शंभूराज देसाईंनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील ‘दौलत’ हे पुस्तक शरद पवार यांना भेट दिले.

Maharashtra TimesMohan Bhagwat : समलिंगी विवाहावर कायदा हवा, समाजालाही तयार करावं लागेल, भागवतांचं मत; अमृता फडणवीस म्हणतात या पिढीत स्वप्नपूर्तीची क्षमताया भेटीबद्दल शंभूराज देसाईंनी आपल्या भावना व्यक्त करताना, “पवार साहेबांनी लोकनेत्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा म्हणजे माझ्यासाठी केवळ संवाद नव्हता, तर एका समृद्ध राजकीय परंपरेचा आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा अनुभव होता’, असे म्हटले आहे. बंद दाराच्या आड झालेल्या चर्चेचा तपशील समोर आलेला नाही. मात्र, या भेटीमुळे सातारा जिल्ह्यात आणि विशेषतः पाटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात जणू भूकंपच झाला आहे.

तीन दशकांपूर्वीच्या घटनांची किनार

पाटणमध्ये 1997 मध्ये लोकनेत्यांचा झालेला शिवसेना पक्ष प्रवेश हा राज्यात गाजला होता. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मरळी कारखान्यावर लाल दिव्याची गाडी घेऊन आले होते. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्षपदही देसाईंना दिले होते. त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेस दुभंगली आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला होता. त्यावेळी सर्वप्रथम विक्रमसिंह पाटणकर हे शरद पवारांसोबत गेले होते.

Maharashtra TimesVikhroli Crime : घाणेरडी गाणी लावल्याने वाद, जाऊबाईंचं दाराजवळ संतापजनक कृत्य, विक्रोळीत पती-मुलगा गमावलेल्या अंजूचा हादरवणारा जबाबशंभूराज देसाई आणि अजित पवार यांच्यात निखळ मैत्री होती. मात्र, शरद पवारांशी त्यांचे सूर कधीही जुळले नव्हते. विद्यमान परिस्थितीत शंभूराज देसाईंनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तीस वर्षे राजकारणात असूनही लोकनेत्यांच्या नातवाला जिल्हा बँकेत प्रवेश करता आला नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी शंभूराज देसाईंनी कंबर कसली आहे आणि जय्यत तयारी देखील केली आहे.