Headlines

Saorabh Choughule Support Sonam Wangchuk ; Saorabh Choughule : वरच्या लेव्हलच्या राजकरणात प्रत्येक मंत्री या पक्षातून त्या पक्षात जातो अन् कार्यकर्ता एकनिष्ठ म्हणून फक्त पाहत राहतो! सोनम वांगचुक प्रकरणी सौरभ चौघुलेची पोस्ट


पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक हे गेले 18 दिवस बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 28 जून पासून त्यांचेही उपोषण सुरू झाले. कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली त्यांनी त्यांचे उपोषण सुरू केले. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणावी तसेच पेपर फुटी प्रकरणात फटका बसलेल्या कुटुंबांना न्याय मिळावा अशा मागण्या सोनम यांनी केल्या होत्या. मात्र अजून 18 दिवस उलटूनही त्याबाबत काहीच हालचाल झाली नाही. या प्रकरणाबाबत फिल्म इंडस्ट्री मधूनही अनेक जण त्यांना पाठिंबा देत आवाज उठवत आहेत.
अभिनेता सौरभ चौगुले यांनी सुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट शहर करून त्याच्या मनातली खदखद व्यक्त केली.

Maharashtra TimesTharala Tar Mag : अनाथांची नाथ होणार सायली, पण प्रिया खेळणार डबल गेम; आश्रमाआड मुलींचा सौदा! सचिनचा क्रूर प्लॅन
तो म्हणाला की, एक घटना घडते आणि त्यामध्ये निष्पाप मुलांचा जीव जातो. त्याची जबाबदारी कोणीच घेत नाही. तसंच जेव्हा एका ट्रेनमध्ये एखाद्यावर सर्वांसमोर चाकू खुपसला जातो किंवा भर रस्त्यात एका मुलीवर तिने नकार दिला म्हणून तिच्यावर हल्ला करण्यात येतो तेव्हा प्रत्येक जण हेच सांगतो की इथे बघणार्यांपैकी कोणीतरी एक जण पुढे येऊन रेकॉर्ड करण्यापेक्षा तिला वाचवू शकलं असतं, किंवा त्याला वाचवू शकलो असत…

आजही तेच आहे. आपल्यासाठी एक व्यक्ती तिथे उपोषणाला बसली आहे. त्या व्यक्तीचा जीव आपण वाचवू शकतो पण आपण काहीच करत नाही. सिम्पल गोष्ट आहे ती म्हणजे एक चुकीची गोष्ट घडते त्या घटनेचे कोणीतरी जबाबदारी घ्यावी किंवा स्पष्टीकरण द्यावं हे कोणीच करत नाही. कोणी बोलतही नाही… आपण भक्त अंधभक्त याकडे नको जाऊ या. वरच्या लेव्हलचे जे राजकारण आहे तिथे त्या राजकारणात प्रत्येक मंत्री या पक्षातून त्या पक्षात जातो किंवा त्या पक्षातून या पक्षात येतो. हे सगळं घडत असतं पण जेव्हा तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून हे बघता…

sonam wangchuk

Maharashtra TimesDhamaal 4 Box Office : धमाल 4 च्या कमाईत घट पण बॉक्स ऑफिसवर पकड कायम; सहाव्या दिवशी एकूण किती कमावले माहितीये?
तुम्हाला हे माहित असतं की चुकीचं घडतंय तरी तुम्ही त्या पक्षाशी त्या माणसाशी एकानिष्ठ आहात. जर तुम्हाला कळतंय की काहीतरी चुकीचं घडतंय तर स्वतःशी एकनिष्ठ राहा ना. कारण आता जर आपण काही बोललो नाही किंवा स्टॅन्ड घेतला नाही तर पुढे जाऊन कोणीही सोनम वांगचुक येऊन आपल्यासाठी स्टॅन्ड घेणार नाही. प्रत्येक जण हाच विचार करेल की अरे बघितलंस ना त्याचं काय झालं मग जाऊदे होईल सगळं नीट… ती वेळ येऊ देऊ नका जेव्हा आपल्याला स्वतःला वाटेल की आपण काहीतरी करू शकलो असतो…

मराठी सिनेइंडस्ट्रीमधून आतापर्यंत अनेक कलाकारांनी सोनम वांगचुक यांच्यासाठी आवाज उठवला आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकर“आकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सलटंट म्हणून कार्यरत. फेब्रुवारी 2023 पासून मटा ऑनलाइनमध्ये मनोरंजन विभागात काम करत असून मनोरंजनासोबत क्राइम आणि चालू घडामोडींवर बातम्या करण्याचीही आवड. सोबतच सेलिब्रिटी मुलाखती, सोशल मीडियावरील ट्रेडिंग कंटेन्ट शोधून त्यावर लेख लिहिण्याचा अनुभव. सामना ऑनलाइन आणि मुक्तपीठ इंटर्नशिप, लोकशाही वृत्त वाहिनीत 6 महिन्यांचा अनुभव, मेरी सहेली या मासिकात 5 वर्ष कंटेट प्रॉड्युसर, सोशल मीडिया हॅण्डलर आणि पॉडकास्ट रिसर्चर म्हणून काम. मेघा मराठी या पोर्टलमध्ये 6 वर्ष काम. साठ्ये महाविद्यालयात बॅचलर ऑफ मास मीडिया विभागातून पत्रकारितेमध्ये पदवी मिळवली .”आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत